बार्टीच्या बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, ‘या’ दिवशी प्रवेश परीक्षा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

बार्टीच्या बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' दिवशी प्रवेश परीक्षा
बार्टी
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 8:36 AM

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 22 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, प्रवेश परीक्षा 26 डिसेंबरला होणार आहे. बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देखील सदर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

22 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 22 डिसेंबर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आलं आहे. तर, 26 डिसेंबरला लेखी परीक्षा होणार आहे.

6 हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून 600 असे एकूण 18 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी साठी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये प्रतिमहिना प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येतील. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्रांचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे.

इतर बातम्या:

MPSC Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरातींचा धडाका सुरुच; जीवरसयानशास्त्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर

MPSC Update: औषध निरीक्षक पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, आयोगाकडून महत्त्वाची माहिती

MPSC : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध, 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

Barti extend dates for application Competitive exam Training Programmes for exams of Bank Railway and LIC Police Recruitment

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.