BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज…

| Updated on: Dec 06, 2021 | 9:19 PM

अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज डाऊनलोड करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की त्यांना या पदांसाठी (BEL Bharti 2021) फक्त नोंदणीकृत पोस्टाद्वारे अर्ज करावा लागेल. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना पाहू शकता.

BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज...
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्लीः BEL Recruitment 2021: प्रशिक्षणार्थी आणि प्रकल्प अभियंतापदांच्या भरतीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ((Bharat Electronics Limited, BEL)) द्वारे अधिसूचना जारी करण्यात आलीय. या अधिसूचनेनुसार, प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण 36 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त पदांच्या अर्जासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट bel-india.in ला भेट द्यावी लागेल.

06 डिसेंबर 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू

प्रशिक्षणार्थी आणि प्रकल्प अभियंता या पदांसाठी (BEL Recruitment 2021) या रिक्त पदांसाठी आजपासून म्हणजेच 06 डिसेंबर 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. 26 डिसेंबर 2021 या रिक्त जागेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेली अधिसूचना पूर्णपणे तपासावी. अर्जामध्ये कोणतीही चूक आढळल्यास (Application Form for BEL Recruitment 2021) नाकारला जाऊ शकतो.

या पदांवर भरती होणार

प्रकल्प अभियंता, सिव्हिल – 24 पदे
प्रकल्प अभियंता, इलेक्ट्रिकल – 6 पदे
प्रकल्प अभियंता, यांत्रिक – 6 पदे

अशा पद्धतीने अर्ज करा

अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज डाऊनलोड करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की त्यांना या पदांसाठी (BEL Bharti 2021) फक्त नोंदणीकृत पोस्टाद्वारे अर्ज करावा लागेल. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना पाहू शकता.

पात्रता काय असेल?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी (BEL Recruitment 2021) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित प्रवाहात चार वर्षांची अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादा काय असावी?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांचे वय 1 डिसेंबर 2021 पासून मोजले जाईल. तसेच उच्च वयोमर्यादेत OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट असेल.

निवड प्रक्रिया

मुलाखत आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

संबंधित बातम्या

उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 8.8 कोटी LPG गॅस कनेक्शन जारी

4 विमान कंपन्यांवर विमानतळ प्राधिकरणाचे 2700 कोटी थकीत, एअर इंडियाचे सर्वाधिक पैसे