BHEL Recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये इंजिनिअर्सची भरती, डिप्लोमाधारकांना देखील संधी

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निर्माण जाली आहे. भेलकडून अभियांत्रिकी क्षेत्रातील उमेदवारांसाठी पदभरती जाहीर केली आहे. एकूण 22 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

BHEL Recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये इंजिनिअर्सची भरती, डिप्लोमाधारकांना देखील संधी
भेल
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 11:38 AM

नवी दिल्ली: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निर्माण जाली आहे. भेलकडून अभियांत्रिकी क्षेत्रातील उमेदवारांसाठी पदभरती जाहीर केली आहे. एकूण 22 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भेलकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईट careers.bhel.in वर भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिममिटेडने इंजिनिअर सिव्हील आणि सुपरवायझर सिव्हील पदासांठी भरतीप्रक्रिया जाहीर केली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. देशभरातील विवध शहरातील पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. भोपाळ , हरिद्वार, हैदराबाद, झाशी, रानीपेट,जगदीशपूर, त्रिची वायझॅक आणि दिल्ली येथील जागा भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 7 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वेबसाईटवरुन लिंक हटवली जाणार आहे.

अर्ज कसा दाखल करणार?

स्टेप 1:  सर्वप्रथम उमेदवारांनी भेलची वेबसाईट career.bhel.in वर भेट द्यावी स्टेप 2: त्यानंतर वेबसाईटवर उपलब्ध असलेला अर्ज डाऊनलोड करा स्टेप 3: अर्जाची प्रिंटआऊट काढून त्यातील माहिती भरा स्टेप 4: अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट आणि आवश्यक कागदपत्र जोडा स्टेप 5: संपूर्ण अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांसह दिलेल्या पत्यावर पाठवून द्या

पात्रता

भेलकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 22 पदं भरली जाणार आहेत. अर्ज दाखल करणारा उमेदवार हा अभियांत्रिकी सिव्हील क्षेत्रातील पदवीधर असणं आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. तर, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 टक्केंची अट निश्चित करण्यात आली आहे. सुपरवायझर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून सिव्हील इंजिनिअरिंगचा डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. संबंधित उमदेवाराला डिप्लोमाला 60 टक्के तर आरक्षित प्रवर्गातील उमदेवारांना 50 टक्के गुण मिळालेले असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

भेलच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय 32 वर्षांपेक्षा अधिक असून नये.

राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020 राज्यातील विविध केंद्रांवर 21 मार्चला घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती.

इतर बातम्या:

राज्य सेवेच्या नियुक्त्या द्या, आयोगासमोर आत्मदहन करु, MPSC ला विद्यार्थ्यांचा 10 सप्टेंबरचा अल्टिमेटम

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

BHEL Recruitment 2021 Application Invited for 22 Engineer & Supervisor post check details here

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.