BSF ची भरती निघाली, बारावी पास उमेदवार करू शकतात अर्ज, इतका मिळेल पगार

अर्जातील सर्व माहिती भरा. सर्व कागदपत्र अपलोड करा. शेवटी अर्ज सबमीट करा. अर्जाची एक प्रींट काढून ठेवा.

BSF ची भरती निघाली, बारावी पास उमेदवार करू शकतात अर्ज, इतका मिळेल पगार
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 3:33 PM

सरकार नोकर भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. बार्डर सेक्युरिटी फोर्सने २४० पेक्षा जास्त पदांवर जागा काढल्या. या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल पदाची भरती होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी बार्डर सेक्युरिटी फोर्सच्या ऑफिशीअल वेबसाईट rectt.bsf.gov.in वर जाऊन २१ मेपर्यंत अर्ज करू शकता. उमेदवारांना लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणीच्या आधारावर निवड केली जाईल.

पगार

भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराला पे-मॅट्रिक लेवल ३ स्केल २५ हजार ५०० रुपयांपासून ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळेल.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डात फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्समध्ये कमीत-कमी ६० टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. परंतु, बारावीनंतर आयटीआयचे उमेदवारही अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

उमेदवाराच्या वयाची तारीख १२ मे २०२३ रोजी गृहित धरली जाईल. वय कमीत-कमी १८ ते जास्तीत जास्त २५ वर्षे राहील. परंतु, आरक्षित वर्गातील उमेदवाराला वयोमर्यादेत काही सुट दिलेली आहे.

जागांची माहिती

बीएसएफअंतर्गत जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, हेड कॉन्स्टेबलचे (रेडियो ऑपरेटर) २१७ पदं आणि हेड कॉन्स्टेबलची (रेडियो मेकॅनिक) ३० पदं भरती केली जातील. या भरतीसाठी पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवार अर्ज भरू शकतात.

निवड प्रक्रिया

भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि कागदपत्र व्हेरीफिकेशनच्या आधारावर केली जाईल.

असा करा अर्ज

सर्वप्रथम बीएसएफच्या वेबसाईटवर bsf.gov.in वर जा. येथे होमपेजवर बीएसएफ हेड कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट २०२३ च्या लिंकवर क्लीक करा. अधिसूचना लक्षपूर्वक वाचा आणि रजीस्ट्रेशन करा. अर्जातील सर्व माहिती भरा. सर्व कागदपत्र अपलोड करा. शेवटी अर्ज सबमीट करा. अर्जाची एक प्रींट काढून ठेवा.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.