CBSE 10th 12th Results 2022 live: विद्यार्थ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला, निकाल लवकरच…!

| Updated on: Jul 22, 2022 | 10:35 AM

CBSE 10th 12th Results 2022 live updates in Marathi: नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या टर्म-1 मध्ये विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. त्यानंतर सीबीएसईला निकाल जाहीर करण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला.

CBSE 10th 12th Results 2022 live: विद्यार्थ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला, निकाल लवकरच...!
CBSE 10th 12th Results 2022Image Credit source: TV9 marathi

CBSE 10th 12th Results 2022 Live Updates: दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ (CBSE 10th 12th Results 2022 Live Updates) आज जाहीर होणं अपेक्षित आहे. बोर्डाने मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत सूचना शेअर केलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, आज नोटीस शेअर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईने बोर्डाच्या (CBSE Board) परीक्षांचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थी आणि शाळांना सात महिन्यांच्या सलग परीक्षेच्या वेळापत्रक दिले, ज्यात दोन बोर्ड, दोन प्री-बोर्ड आणि प्रॅक्टिकल्सचा समावेश आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या टर्म-1 मध्ये विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. त्यानंतर सीबीएसईला निकाल (CBSE Results) जाहीर करण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. यावर्षी टर्म 1 आणि टर्म 2 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in जाहीर केला जाईल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Jul 2022 02:45 PM (IST)

    CBSE 10th 12th Results 2022 live: सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट्स

    या खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइट्स आहेत, जिथे विद्यार्थी त्यांचे सीबीएसई इयत्ता 10 वी, 12 वी चा निकाल 2022  तपासू शकतील.

  • 20 Jul 2022 01:57 PM (IST)

    CBSE 10th 12th Results 2022 live: विद्यार्थ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाच्या घोषणेच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती नसताना विद्यार्थ्यांना अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करणे खूप कठीण जात असले तरी विद्यार्थ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • 20 Jul 2022 01:32 PM (IST)

    CBSE 10th 12th Results 2022 live: निकाल तपासण्यासाठी आवश्यक तपशील

    विद्यार्थ्यांनी आताच तयार आपले प्रवेशपत्र काढून आपल्याकडे ठेवावे. कारण निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर आणि जन्मतारीख  तपशील आवश्यक असतील.

  • 20 Jul 2022 01:22 PM (IST)

    CBSE 12th Results 2022 live: इयत्ता 12 वी सीबीएसई निकाल 2022

    बारावीचे विद्यार्थी आपल्या सीबीएसईच्या निकालाबद्दल खूप अस्वस्थ आहेत आणि चिंताग्रस्त आहेत कारण त्यांना अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी अर्ज करायचा आहे आणि विद्यापीठांनी यूजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश आधीच सुरू केले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. परंतु सीबीएसईच्या निकालानंतर प्रवेश सुरू करावेत, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांनी सर्व उच्च शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना केले आहे.

  • 20 Jul 2022 01:10 PM (IST)

    CBSE 10th 12th Results 2022 live: 10वी आणि 12वी CBSEच्या निकालाची तारीख आणि वेळ

    सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल आज जाहीर होईल अशी अपेक्षा आहे, पण अधिकृत घोषणेची अद्याप प्रतीक्षा आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळेबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

  • 20 Jul 2022 12:53 PM (IST)

    CBSE 10th Results 2022 live: सीबीएसई 10 वी 2022 रिझल्ट डिजिलॉकर ॲपद्वारे

    • डिजिलॉकर ॲप किंवा वेबसाइटवर digilocker.gov.in जा.
    • तुमच्या आधार कार्ड नंबरच्या मदतीने नोंदणी करा.
    • क्रेडेन्शियल्सच्या मदतीने डिजिलॉकर खात्यात लॉग इन करा.
    • ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’वर क्लिक करा.
    • आता ‘सीबीएसई 10 वी रिझल्ट 2022’ किंवा ‘सीबीएसई 12 वी रिझल्ट 2022’ पास सर्टिफिकेट निवडा.
    • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर ओपन होईल, डाऊनलोड करण्यासाठी लॉग इन करा.
    • ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.
  • 20 Jul 2022 12:33 PM (IST)

    CBSE 10th 12th Results 2022 live: कसा पाहणार निकाल?

    • विद्यार्थ्यांनी प्रथम सीबीएसई www.cbse.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
    • यानंतर होम पेजवर दिलेल्या “सीबीएसई दहावी बारावी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा.
    • आता आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
    • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
    • तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ती तुमच्याकडे ठेवा.
  • 20 Jul 2022 12:17 PM (IST)

    CBSE 12th Results 2022 live: काळजी करू नका, UGC तुमच्या सोबत!

    अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमधील प्रवेशाबाबत अत्यंत काळजीत आणि चिंतेत असलेल्या सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना काळजी न करण्याचा सल्ला देण्यात आलाय. कारण सीबीएसईच्या निकालाच्या घोषणेनंतर प्रवेशाची तारीख पुन्हा निश्चित करावी, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) अध्यक्षांनी सर्व विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांना केले आहे.

  • 20 Jul 2022 12:03 PM (IST)

    CBSE 10th 12th Results 2022 live: तुम्ही या वेबसाइट्सवर पाहू शकता निकाल

  • 20 Jul 2022 11:52 AM (IST)

    CBSE 10th 12th Results 2022 live: सीबीएसई निकाल वेळेवर येईल- केंद्रीय शिक्षणमंत्री

    सीबीएसईच्या निकालाला विलंब नाही. सीबीएसईच्या परीक्षा 15 जूनपर्यंत सुरू होत्या. त्यानंतर तपासणीसाठी 45 दिवस लागतात. मी कालच सीबीएसई (अधिकाऱ्यांशी) बोललो आणि निकाल वेळेवर येईल.

    – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

Published On - Jul 20,2022 11:44 AM

Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.