CBSE 10th Results 2022 Declared: बारावीनंतर आता सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर! या लिंकवर जाऊन निकाल पहा…
CBSE 10th Results 2022 updates: सीबीएसई बारावीच्या निकालानंतर आता सीबीएसई दहावीचा निकाल लागलेला आहे.
अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. सीबीएसई बारावीच्या निकालानंतर (CBSE 12th Results 2022) आता सीबीएसई दहावीचा निकाल (CBSE 10th Results 2022) लागलेला आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल तपासता येणार आहे. सीबीएसईनेही बारावीनंतर दहावीचा निकाल जाहीर केला आहे. दुपारी दोनच्या सुमारास बोर्डाने निकाल जाहीर केला. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर (CBSE Official Website) cbseresults.nic.in निकाल तपासता येणार आहे. नुकताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निकाल जाहीर होण्याबाबत सांगितलं होतं की, “सीबीएसईचा निकाल जाहीर होण्यास कोणताही विलंब झालेला नाही. 2 बोर्डाची टर्म परीक्षा 15 जून रोजी संपली आणि त्यानंतर तपासणीचे काम सुरू झाले. ते पुढे म्हणाले की, सीबीएसईचा निकाल तपासण्यासाठी 45 दिवस लागतात, आज फक्त 30 दिवस झाले आहेत. निकाल यथावकाश जाहीर होतील.” 26 एप्रिल ते 24 मे 2022 दरम्यान सीबीएसईने देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा आयोजित केली होती. कोविड-19 प्रतिबंधासाठीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत ही परीक्षा घेण्यात आली. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत 94.40 टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.
कसा पाहणार निकाल
- विद्यार्थ्यांनी प्रथम सीबीएसई www.cbse.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- यानंतर होम पेजवर दिलेल्या “सीबीएसई दहावी बारावी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा.
- आता आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ती तुमच्याकडे ठेवा.
सीबीएसई 10 वी 2022 डिजिलॉकर ॲपद्वारे
- डिजिलॉकर ॲप किंवा वेबसाइटवर digilocker.gov.in जा.
- तुमच्या आधार कार्ड नंबरच्या मदतीने नोंदणी करा.
- क्रेडेन्शियल्सच्या मदतीने डिजिलॉकर खात्यात लॉग इन करा.
- ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’वर क्लिक करा.
- आता ‘सीबीएसई 10 वी रिझल्ट 2022’ किंवा ‘सीबीएसई 12 वी रिझल्ट 2022’ पास सर्टिफिकेट निवडा.
- तुमचा रिझल्ट स्क्रीनवर ओपन होईल, डाऊनलोड करण्यासाठी लॉग इन करा.
- ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.