तरुणांसाठी ढांसू बातमी… सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, एकूण 253 पदे भरली जाणार; बातमी क्लिक करून वाचाच

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 253 जागांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ही भरती आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर 2024 आहे. ऑनलाइन परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी आणि मुलाखती 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात होतील. पात्रता मानदंड आणि अर्ज प्रक्रियाची माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

तरुणांसाठी ढांसू बातमी... सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, एकूण 253 पदे भरली जाणार; बातमी क्लिक करून वाचाच
Central Bank of India RecruitmentImage Credit source: Getty Images
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 11:32 PM

तुम्हाला जर बँकेत नोकरी करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बंपर भरती काढली आहे. सेंट्रल बँकेत 253 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठीचं नोटफिकेशन काढण्यात आलं आहे. चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदे भरण्यासाठी ही भरती काढण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 18 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://www.centralbankofindia.co.in/ वर ही माहिती दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 3 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सेंट्रल बँक भर्ती 2024 बद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. यात नोटिफिकेशन PDF डाउनलोड लिंक, ऑनलाइन अर्ज विंडो, महत्त्वाच्या तारखा, पात्रता मानदंड आणि इतर महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे.

रिक्तपदांची माहिती

एससी IV – सीएम: 10 पदे

एससी III – एसएम: 56 पदे

एससी II – एमजीआर: 162 पदे

एससी I – एएम: 25 पदे

पात्रता

विहित नमुन्यात जी शैक्षणिक अर्हता दिली आहे, पदासाठी जो अनुभव, वय आणि पात्रतेचे निकष दिले आहेत, त्यात बसणारा कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो.

निवड प्रक्रिया

निवड ऑनलाइन प्लेटफॉर्म चाचणी / परिस्थिती आधारित परीक्षण आणि वैयक्तिक मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल.

डेवलपर पदासाठी: सुमारे 3.30 तासांची ऑनलाइन कोडिंग परीक्षा असेल, ज्यामध्ये पहिला अर्धा तास कागदावर काम करण्यासाठी (कंप्यूटर विना) आणि पुढील 3 तास कंप्यूटरवर कोडिंग करण्यासाठी असतील.

इतर पदांसाठी: वस्तुनिष्ठ (MCQ) प्रकाराची परीक्षा OMR शीट आणि OBRIC प्रणालीचा वापर करून घेतली जाईल. या परीक्षेत 50 वस्तुनिष्ठ प्रकाराचे प्रश्न असतील आणि परीक्षा 2 तासांपर्यंत चालेल. यात नकारात्मक गुण नाहीत. परीक्षा इंग्रजीत उपलब्ध असेल.

अर्ज शुल्क:

अनुसूचित जाती/अनुसूचित जनजाति/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 175/- + जीएसटीसह असेल. तसेच इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये असेल. यात जीएसटीचा समावेश आहे.

पेमेंट डेबिट कार्ड (रुपे/वीसा/मास्टरकार्ड/मेस्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट वापरून केले जाऊ शकते. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

ऑनलाइन परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी घेतली जाईल. मुलाखतीची संभाव्य तारीख 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात असेल.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.