सरकारी नोकरी हवी, दहावी पास आहात? मग फटाफट करा अर्ज, तब्बल 484 पदांसाठी भरती, थेट मिळवा सरकारी नोकरी

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. उमेदवाराची निवड ही थेट परीक्षाच्या माध्यमातून केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही भरती विविध पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

सरकारी नोकरी हवी, दहावी पास आहात? मग फटाफट करा अर्ज, तब्बल 484 पदांसाठी भरती, थेट मिळवा सरकारी नोकरी
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 2:28 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांना 9 जानेवारी 2024 पूर्वीच अर्ज करणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 484 पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवली जाणारी ही भरती विविध राज्यांसाठी होत आहे. ही भरती दहावी पास असणाऱ्यांसाठी आहे. दहावी पास उमेदवारांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. कारण थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी त्यांच्याकडे आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात येत असलेली ही भरती प्रक्रिया 20 डिसेंबर 2023 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. centralbankofindia.co.in किंवा ibpsonline.ibps.in/cbiskssnov23 या साईटवर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेतून केली जाणार आहे. मार्च 2024 मध्ये एक परीक्षा घेतली जाईल. विशेष म्हणजे ही परीक्षा विविध स्थानिक भाषांमध्येच पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असणे आवश्ययक आहे. त्याच्याकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे दहावी पासचे प्रमाणपत्र असायला हवे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 26 असायला हवे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 850 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. जर उमेदवार प्रवर्गात येत असेल तर त्याला 175 रूपये फिस भरावी लागेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी आपले अर्ज करावेत. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.