वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये 211 जागांवर भरती, सरकारी नोकरीची चांगली संधी

कोल इंडियाची सहाय्यक कंपनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये पदं भरली जाणार आहेत. या सरकारी नोकरीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डब्लूसीएल वेबसाइट Westerncoal.in वरही अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये 211 जागांवर भरती, सरकारी नोकरीची चांगली संधी
सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 6:14 PM

WCL Mining Sirdar and Surveyor Recruitment 2021 नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या उपक्रमात नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. कोल इंडिया या भारत सरकारच्या कंपनीत रिक्त जागा भरायच्या आहेत. 211 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कोल इंडियाची सहाय्यक कंपनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये पदं भरली जाणार आहेत. या सरकारी नोकरीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डब्लूसीएल वेबसाइट Westerncoal.in वरही अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

पदांची माहिती

मायनिंग सरदार – 167 सर्वेक्षक – 44 एकूण पदांची संख्या – 211

पगार किती ?

मायनिंग सरदार – 31,852 रुपये सर्वेक्षक – 34,391 रुपये दरमहा

हे फक्त मूळ वेतन आहे. तुम्हाला इतर सर्व भत्त्यांसह केंद्र सरकारच्या नियमानुसार पूर्ण वेतन मिळेल, जे जवळपास दुप्पट असेल.

डब्ल्यूसीएल मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक पात्रता:

मायनिंग सरदार साठी डिप्लोमा इन मायनिंग किंवा माइन सर्वेइंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. डीजीएमएसने जारी केलेले ओव्हरमॅन सक्षमता प्रमाणपत्र आणि वैध प्रथमोपचार प्रमाणपत्रासह वैध गॅस चाचणी प्रमाणपत्र किंवा डीजीएमएसने जारी केलेले वैध मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे

सर्वेक्षक – 10 वी नंतर सर्वेक्षक प्रमाणपत्र (DGMS द्वारे जारी केलेले) किंवा DGMS द्वारे जारी केलेले खाण किंवा खाण सर्वेक्षण किंवा सर्वेक्षक सक्षमता प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा – वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक भरती 2021 साठी तुमचे वय किमान 18 आणि कमाल 30 वर्षे असावे. आरक्षित श्रेणींना सरकारी नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेत शिथिलतेचा लाभ मिळेल.

अर्ज कसा करावा

आपल्याला WCL वेबसाइट westcoal.in ला भेट देऊन अर्ज भरावा लागेल. अर्ज भरण्याची प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. लेखी परीक्षा घेतली जाईल. या आधारावर निवड केली जाईल.

डब्ल्यूसीएल मायनिंग सिरदार आणि सर्वेक्षक अधिसूचना 2021 साठी येथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. WCL वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

इतर बातम्या:

100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!

Coal India Recruitment 2021 Mining Sirdar Surveyor vacancy apply at westerncoal.in

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.