UPSC CMS Reserve List 2021 : आयोगाकडून राखीव उमेदवारांची यादी जाहीर, अधिकृत वेबसाईटवरुन करा डाऊनलोड

भरती प्रक्रियेचा अंतिम निकालसुद्धा 27 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झाला आहे. आयोगाने याच भरती प्रक्रियेअंतर्गत 97 उमेदवारांची रिझर्व्ह लिस्ट जारी केली आहे. (Commission announces reserved list of candidates, download from official website)

UPSC CMS Reserve List 2021 : आयोगाकडून राखीव उमेदवारांची यादी जाहीर, अधिकृत वेबसाईटवरुन करा डाऊनलोड
UPSC
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 8:06 AM

नवी दिल्ली : लोकसेवा आयोगाने (युपीएससी) कंबाइण्ड मेडिकल सर्व्हिस परीक्षा 2019 साठीची रिझर्व्ह लिस्ट म्हणजेच राखीव यादी जारी केली आहे. जे उमेदवार इंटरव्‍यू राऊंडमध्ये सामील झाले होते, ते अधिकृत वेबसाईटवर जाऊन यादी डाऊनलोड करु शकतील. उमेदवारांना या यादीत आपले नाव चेक करता येईल. मुलाखत फेरीचा निकाल याआधीच जाहीर करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेचा अंतिम निकालसुद्धा 27 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झाला आहे. आयोगाने याच भरती प्रक्रियेअंतर्गत 97 उमेदवारांची रिझर्व्ह लिस्ट जारी केली आहे. (Commission announces reserved list of candidates, download from official website)

अशी करा यादी डाउनलोड

स्टेज 1 : upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. स्टेज 2 : होम पेजवर दर्शविलेल्या राखीव यादीतील लिंकवर क्लिक करा. स्टेज 3: आता नवीन पेजवर दिसणार्‍या पीडीएफ फाईलच्या लिंकवर जा. स्टेज 4: आपल्या स्क्रीनवर रिझर्व्ह लिस्ट ओपन होईल. स्टेज 5: या यादीमध्ये आपले नाव चेक करा. स्टेज 6: आपल्याजवळ यादी सेव्ह करून ठेवा.

रिझर्व्ह लिस्ट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आयोगाने यादी जारी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या चुकीच्या आणि दिशाभूल करणार्‍या माहितीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आयोगाने जारी केलेल्या नोटीसमध्ये उमेदवारांना सांगण्यात आले आहे की केवळ अधिसूचनेत नोंद असलेल्या नियमांच्या आधारे राखीव यादी तयार केली गेली आहे. सध्याची रिझर्व्ह लिस्ट ही कोणतीही प्रतीक्षा यादी नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

कागदपत्रे साददर न केल्यास उमेदवारी रद्द होणार

सर्व शॉर्टलिस्टेड उमेदवारांना आयोगाच्या सांगितल्याप्रमाणे आपली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत त्यांचा निकाल तात्पुरता राखून ठेवण्यात आला आहे, अशा उमेदवारांना नियुक्तीची ऑफर आयोग देणार नाही. या उमेदवारांची तरतूद केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वैध राहील. या कालावधीत आयोगाच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास उमेदवार अपयशी ठरल्यास त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल. (Commission announces reserved list of candidates, download from official website)

इतर बातम्या

कुलाबा झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता

ई-कॉमर्स कंपन्यांच्या अडचणी वाढणार ?, नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे सरकार कठोर नियम लागू करण्याची शक्यता

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.