CRPF Recruitment 2021: सीआरपीएफमध्ये पॅरामेडिकल स्टाफची मोठी भरती, 2439 पदांवर थेट भरती

सीआरपीएफने देशभरातील विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे. एकूण 2439 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

CRPF Recruitment 2021: सीआरपीएफमध्ये पॅरामेडिकल स्टाफची मोठी भरती, 2439 पदांवर थेट भरती
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 3:46 PM

CRPF Recruitment 2021 नवी दिल्ली: केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. सीआरपीएफने देशभरातील विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे. एकूण 2439 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट crpf.gov.in ला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात.

केंद्रीय राखीव पोलीस दलाने जारी केलेल्या या रिक्त जागेत (CRPF भर्ती 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या पदांसाठी उमेदवार 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान होणाऱ्या मुलाखतीत थेट उपस्थित राहू शकतात. अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून उमेदवार या पदांचे अर्ज स्वरूप (CRPF भर्ती 2021) पाहू शकतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) कंत्राटी तत्त्वावर विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

मुलाखतीद्वारे निवड

पात्र आणि इच्छुक उमेदवार सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या दिनांकाला आणि वेळेला मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ आणि संबंधित कागदपत्रे त्यांच्या फोटोकॉपीसह (सेवानिवृत्ती प्रमाणपत्र/पीपीओ, पदवी, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र इ.) सोबत ठेवणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, उमेदवारांना सर्व माहितीसह अर्ज साध्या कागदावर लिहून सादर करावा लागेल. अर्ज केलेल्या पदाचे नाव अर्जात भरावे लागेल. अर्जासोबत अलीकडील 3 फोटो सोबत ठेवावे लागतील.

पदांचा तपशील

आसाम रायफल्स (AR) – 156 सीमा सुरक्षा दल (BSF)- 365 केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) – 1537 इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP)- 130 सर्विस सिलेक्शन बोर्ड (SSB) – 251

पात्रता

सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र सेना निवृत्त उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादेशी संबंधित अधिक माहितीसाठी, आपण अधिकृत अधिसूचना पाहू शकता.

निवड प्रक्रिया

केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अशा परिस्थितीत, जे उमेदवार त्यात अर्ज करतील त्यांना 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान होणाऱ्या मुलाखतीत उपस्थित राहावे लागेल.

इतर बातम्या:

Taliban in Kabul: तालिबान्यांची काबूलमध्ये धडक, अफगाणिस्तानच्या राजधानीला वेढा, नेमकं काय घडतंय?

अफगाणिस्तानमध्ये बंदुका आणि रॉकेट घेऊन तालिबान्यांची खुलेआम दहशत, धडकी भरवणारी दृश्ये

CRPF Recruitment 2021 for Paramedical Staff post in Central Reserve Police Force

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.