MPSC च्या राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण 416 उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र देणार, दत्तात्रय भरणेंची माहिती

| Updated on: Nov 18, 2021 | 1:48 PM

राज्य सेवा परीक्षा 2019 चे 416 विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं. काही बदलांमुळं विद्यार्थी कोर्टात गेले होते त्यामुळं नियुक्तीपत्र द्यायला उशीर झाला आहे, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

MPSC च्या राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण 416 उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र देणार, दत्तात्रय भरणेंची माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग दत्तात्रय भरणे
Follow us on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा 2019 चे 416 विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं. काही बदलांमुळं विद्यार्थी कोर्टात गेले होते त्यामुळं नियुक्तीपत्र द्यायला उशीर झाला आहे. मात्र, आज त्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात बैठक बोलावल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

15 हजार जागांचं मागणीपत्र एमपीएससीला देणार

विधानसभेत अजित पवार यांनी 15 हजार जागांवर एमपीएससी तर्फे भरती करणार असल्याचं सांगितलं होतं. आता 7 हजार 168 पदांचं मागणीपत्र एमपीएससीला दिलं आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आणखी जागांसाठी मागणीपत्र एमपीएससीला देणार आहे, असं सामान्य प्रशासन विभागाचे राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

वयोमर्यादा वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच

राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गामुळं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष वयोमर्यादा वाढवून देण्यात आली आहे. परीक्षा न झाल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यानं त्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. अर्ज करण्याची मुदत संपली असली तर विद्यार्थ्यांना नंतर अर्ज भरण्याची मुदत दिली जाईल, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

नियुक्तीसाठी विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, या पदांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

इतर बातम्या :

 

MPSC चा धडाका सुरुच, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, औषध निरीक्षक पदाच्या 87 जागांसाठी जाहिरात

MPSC News : दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जाहीर, आता निकालाची प्रतीक्षा

Dattatray Bharane said State Service Exam Appointment letter of 416 gave soon to candidates