बार्टीकडून बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचं आयोजन, धनंजय मुंडे यांचं विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आवाहन

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 30 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेनुसार अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टी कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

बार्टीकडून बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचं आयोजन, धनंजय मुंडे यांचं विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आवाहन
BARTI AND DHANANJAY MUND
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 6:45 PM

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 30 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेनुसार अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टी कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बार्टी मार्फत 30 केंद्राच्या विस्तृत यादीसह पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सदर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 09 डिसेंम्बर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.

6 हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून 600 असे एकूण 18 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी साठी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये प्रतिमहिना प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येतील. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्रांचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविता येईल. इच्छुक व पात्र असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

इतर बातम्या:

Bank Recruitment 2021: सेंट्रल बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या 115 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

MPSC Update : PSI पदाची पुणे कोल्हापूर केंद्रावरील शारीरिक चाचणी आणि मुलाखत लांबणीवर, उमदेवारांमध्ये संभ्रम

Dhananjay Munde Appeal SC Category Students to enroll Barti Competitive exam Training Programme

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.