AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7th Pay Commission : नागपूर एम्समध्ये थेट भरती! 2 लाखांची वेतनश्रेणी आणि भत्त्याचा लाभ

या भरती मोहिमेद्वारे एकूण 17 रिक्त पदे भरली जातील. यामध्ये असोसिएट प्रोफेसरच्या एकूण 5 रिक्त पदे आणि सहायक प्राध्यापक पदावरील एकूण 12 रिक्त पदांचा समावेश आहे. (Direct recruitment in AIIMS Nagpur, 2 lakh salary scale and allowance benefit)

7th Pay Commission : नागपूर एम्समध्ये थेट भरती! 2 लाखांची वेतनश्रेणी आणि भत्त्याचा लाभ
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 7:18 AM

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर यांनी प्राध्यापक गट-एच्या विविध विभागातील विविध पदांवर थेट भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र उमेदवारांची नेमणूक झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी दिली जाईल. इच्छुक उमेदवार ईमेलद्वारे 7 एप्रिल 2021 आणि पोस्टद्वारे 22 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. (Direct recruitment in AIIMS Nagpur, 2 lakh salary scale and allowance benefit)

या विभागात मिळेल नोकरी

एम्स नागपूर भर्ती 2021 च्या अधिसूचनेनुसार, येथे एंडोक्रिनोलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, मेडिकल ऑन्कोलॉजी, न्यूऑनॉलॉजी, न्यूरोलॉजी, ऑप्थॅलॉजी, रेडिओडायग्नोसिस, सर्जिकल ऑन्कोलॉजी, रेडिओडिनोसिस, ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा अ‍ॅन्ड इमरजेंसी विभागातील सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदावर नोकरी दिली जाईल. या भरती मोहिमेद्वारे एकूण 17 रिक्त पदे भरली जातील. यामध्ये असोसिएट प्रोफेसरच्या एकूण 5 रिक्त पदे आणि सहायक प्राध्यापक पदावरील एकूण 12 रिक्त पदांचा समावेश आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी

एम्सच्या विविध विभागात थेट भरतीमध्ये सहयोगी प्राध्यापक पदासाठी वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगाच्या (7 व्या वेतन आयोग) लेव्हल -13 ए 1 अंतर्गत 1,38,300-2,09,200 रुपये वेतन व सहाय्यक प्रोफेसर पदासाठी सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल 12 अंतर्गत 1,01,500 -1,67,400 रुपये वेतन तसेच एनपीएसह सामान्य भत्त्यांचा लाभ मिळेल.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

आपण या जॉबसाठी अर्ज करू इच्छित असाल तर संबंधित विभागाकडून निर्धारीत केलेली शैक्षणिक पात्रता आणि वयाची मर्यादा याचे अवलोकन करा. वय मर्यादेतील दिलासाबाबत माहितीसाठी आपणास विभागीय जाहिरातींचे अवलोकन करु शकता.

अर्ज फी

उमेदवारांना ‘डायरेक्टर एम्स नागपूर’ च्या नावाने डिमांड ड्राफ्टद्वारे 2000 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी 500 रुपये आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देखील देऊ शकता.

अर्ज कसा करावा?

सर्व मार्गदर्शक तत्त्वे वाचल्यानंतर, उमेदवारांनी एआयएमएस नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, भूखंड क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108 येथे संचालक, एम्स नागपूर, येथे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज स्पीड पोस्ट करावा. (Direct recruitment in AIIMS Nagpur, 2 lakh salary scale and allowance benefit)

संबंधित बातम्या

एसएससी सीएचएसएल परीक्षा 12 एप्रिलपासून, 30 दिवसांच्या क्रॅश कोर्ससह होईल तयारी पक्की

UGC NET 2021 : युजीसी नेट परीक्षा अर्जाची करेक्शन विंडो खुली, या तारखेपर्यंत करु शकता दुरुस्ती

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.