Career Tips: दहावीनंतर हे पाच डिप्लोमा कोर्स करा, चांगले करिअर आणि सॅलरीही मिळेल

प्रत्येक कोर्सचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर करिअरची निवड केली जाते. या लेखाच्या माध्यमातून दहावीनंतर पाच बेस्ट डिप्लोमा ऑप्शन्स तुमच्या माहितीसाठी देत आहोत.

Career Tips: दहावीनंतर हे पाच डिप्लोमा कोर्स करा, चांगले करिअर आणि सॅलरीही मिळेल
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 9:46 PM

Top 5 Diploma Course after 10th: तुम्ही दहावी पास आहात. योग्य करिअर निवड करू शकत नसाल तर तुमच्या कामाचे हे पाच करिअर ऑप्शन्स आहेत. नोकरीतील बदल पाहता विद्यार्थ्यांना अधिक कुशल बनवण्यासाठी स्पेशल कोर्स किंवा डिप्लोमा कोर्सची मागणी वाढत आहे. हे कोर्स विद्यार्थ्यांच्या आवडीवर निर्धारित आहेत. प्रत्येक कोर्सचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर करिअरची निवड केली जाते. या लेखाच्या माध्यमातून दहावीनंतर पाच बेस्ट डिप्लोमा ऑप्शन्स तुमच्या माहितीसाठी देत आहोत.

डिप्लोमा इन होटल मॅनेजमेंट

डिप्लोमा इन होटल मॅनेजमेंट कोर्स विद्यार्थी दहावीनंतर करू शकतात. कित्तेक खासगी आणि सरकारी संस्थानांत हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. हा डिप्लोमा कोर्स एक वर्षाच्या कालावधीचा आहे. या कोर्ससाठी ५० हजार ते एक लाख रुपये खर्च करावे लागतात. या क्षेत्रात जॉब करणाऱ्याची सरासरी सॅलरी दोन लाख ते ४ लाख रुपये वार्षिक असते.

हे सुद्धा वाचा

डिप्लोमा इन इंजिनीअरिंग

दहावीनंतर तीन वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा कोर्सही करता येतो. दहावीनंतर हा सर्वात लोकप्रीय कोर्स आहे. या कोर्ससाठी देशभरात विविध कॉलेज आणि संस्थानांमध्ये शिकता येते. सायन्स आणि टेक्नॉलॉजीत रुची असणारे विद्यार्थी या कोर्सबाबत विचार करू शकतात. हा कोर्स केल्यानंतर कँपस प्लेसमेंटमध्ये चांसेस चांगले आहेत. या कोर्सनंतर अनुभव घेतल्यास ८ लाखांपर्यंत सॅलरी मिळते.

डिप्लोमा इन डिजीटल मार्केटिंग

डिजीटल मार्केटिंगच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठी मागणी आहे. या फिल्डमध्ये करिअर करू इच्छिणारे सर्व विद्यार्थी डिप्लोमा इन डिजीटल मार्केटिंगचा कोर्स निवडू शकतात. एसईओ, सोशल मीडिया मार्केटिंग आणि ई-मेल मार्केटिंग शिकता येते. हा कोर्स करण्यासाठी ५० हजार ते दीड लाख रुपये खर्च करावे लागतात. हा कोर्स केल्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. सुरुवातीला दीड ते ५ लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते.

डिप्लोमा इन फॉर्मसी

दहावीनंतर विद्यार्थी हा कोर्स करून फॉर्मास्कुटीकल उद्योगात करिअर करू शकतात. ड्रग्स, फॉर्मसी लॉ यासंदर्भात कोर्स करता येतात. हे कोर्स दोन वर्षांचे असतात. प्रायव्हेट फॉर्मसी कंपन्या या डिग्रीवाल्यांना चागंल्या सॅलरीची नोकरी देतात.

डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर सायन्स

कृषी आणि कृषी विज्ञानात रस असणारे विद्यार्थी दहावीनंतर डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर कोर्स करू शकतात. कृषी इंजिनीअरिंगचे सिद्धांत, प्लांट ब्रिडिंग, ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी विषय या कोर्समध्ये सहभागी आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.