ECHS मध्ये शिपाई पदावर भरती, अर्ज कुठे करायचा? आठवी पास उमेदवारांना मिळणार ‘इतका’ पगार
एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम (ECHS) मध्ये 11 महिने आणि 1 वर्ष कलावाधी करत मुंबईतील ईसीएचएस पॉलिक्लिनिक्स ठाणे सीबीडी बेलापूरमध्ये कंत्राटी तत्वावर शिपाई पदासाठी अर्ज मागवण्यात आला आहे.
मुंबई : एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम (ECHS) मध्ये 11 महिने आणि 1 वर्ष कलावाधी करत मुंबईतील ईसीएचएस पॉलिक्लिनिक्स ठाणे सीबीडी बेलापूरमध्ये कंत्राटी तत्वावर शिपाई पदासाठी अर्ज मागवण्यात आला आहे. शिपाई पदासाठी उमेदवार आठवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज पोस्टानं पाठवायचा असून 5 ऑक्टोबरपूर्वी पोहोचणं आवश्यक आहे.
अर्ज कुठं पाठवायचा
ईसीएचएसच्या वेबसाईटवर अर्जाचा नमुना मिळेल. अर्जाचा नमुना वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेऊन तो संपूर्ण भरुन स्टेशन हेडक्वार्टर्स, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखूर्द, मुंबई 400088 या पत्त्यावर पोस्ट, कुरिअर किंवा ईमेलद्वारे पाठवण्याचं आवाहन कऱण्यात आलं आहे. शिपाई पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना 16 हजार 800 रुपये मानधन दिलं जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत 26 जागांवर भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगली संधी निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं विविध पदांच्या 26 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून या संदर्भात नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पदांसाठी ऑफलाईन अर्ज करायचे असून थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, केंद्रप्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी मुलाखतींद्वारे उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदासाठी 1 जागा, केंद्रप्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक 1 जागा वरिष्ठ तंत्रज्ञ 12 जागा आणि कनिष्ठ तंत्रज्ञ 11 जागांवर भरती करण्यात येणार आहे. या जागा कंत्राटी तत्त्वावर भरल्या जाणार आहेत.
यूपीएससीतर्फे 439 पदांवर भरती परीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि जिओ सायंटिस्ट प्रीलिम्स परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. जे पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते यूपीएससीच्या upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे 247 जागा आणि जिओ सायंटिस्टसाठी 192 जागांवर भरती होणार आहे.
महत्वाच्या तारखा यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाला आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 6:00 पर्यंत वेळ दिला जाईल. अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीखही तीच असेल.
जिओ सांयटिस्ट परीक्षा 20 फेब्रुवारीला जिओ सायंटिस्टसाठी प्रीलिम्स परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल तर अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षेपूर्वी आयोगाकडून प्रवेशपत्र दिले जातील. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे.
इतर बातम्या:
echs recruitment 2021 notification for peon post check details here