ESIC Recruitment 2024 : 2 लाख रुपये महिन्याला पगार, कोणतीही लेखी परीक्षा नाही; ‘या’ सरकारी नोकरीसाठी पटापट अर्ज करा
कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) ने 59 व्यावसायिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, डेंटल सर्जन आणि सीनियर रेजिडेंट या पदांसाठी 27 नोव्हेंबर 2024 रोजी लुधियाना येथे वॉक-इन इंटरव्ह्यू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे. पगार 60,000 रुपये ते 2 लाख रुपये प्रति महिना आहे. अधिक माहितीसाठी esic.gov.in ला भेट द्या.
प्रत्येकाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. पण सर्वांनाच सरकारी नोकरी मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे मन खट्टू होतं. पण आता घाबरू नका. तुम्हाला लवकरच सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. कारण ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) ने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांमधून नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. जे उमेदवार देशातील सर्वात प्रमुख आरोग्य सेवा संस्थांपैकी एक असलेल्या ईएसआयसीमध्ये उच्च सॅलरी असलेली नोकरी करू इच्छितात, ते ईएसआयसीची अधिकृत वेबसाइट esic.gov.in वर जाऊन आपला अर्ज सादर करू शकतात.
ESIC Recruitment 2024 : पदांची माहिती
सुपर स्पेशलिस्ट (फुल टाइम/पार्ट टाइम) – 4 पदे
स्पेशलिस्ट – 5 पदे
डेंटल सर्जन – 1 पद
सीनियर रेजिडेंट (3 वर्षांचा करार) – 35 पदे
सीनियर रेजिडेंट (1 वर्षाचा कार्यकाल, जीडीएमओ रिप्लेसमेंट) – 14 पदे
ESIC Vacancy 2024 : किती पदांवर भरती?
कर्मचारी राज्य बीमा निगम एकूण 59 व्यावसायिक पदांसाठी भरती करणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे. या भरतीच्या अंतर्गत ईएसआयसी आपल्या रुग्णालयांमध्ये सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, सीनियर रेजिडेंट आणि डेंटल सर्जन पदांसाठी भरती करेल.
SIC Jobs 2024 : वयोमर्यादा
सुपर स्पेशलिस्ट (फुल टाइम/पार्ट टाइम) – 69 वर्षपर्यंत
स्पेशलिस्ट – 69 वर्षपर्यंत
डेंटल सर्जन – 45 वर्षपर्यंत
सीनियर रेजिडेंट (3 वर्षांचा करार) – 45 वर्षपर्यंत
सीनियर रेजिडेंट (1 वर्षाचा कार्यकाल, जीडीएमओ रिप्लेसमेंट) – 45 वर्षपर्यंत
ESIC Recruitment 2024 पगार किती मिळेल?
सुपर स्पेशलिस्ट (फुल टाइम) – 2 लाख रुपये प्रति महिना
सुपर स्पेशलिस्ट (पार्ट टाइम) – 1 लाख रुपये प्रति महिना
स्पेशलिस्ट (पार्ट टाइम) – 60,000 रुपये ते 1 लाख रुपये प्रति महिना
डेंटल सर्जन – 60,000 रुपये प्रति महिना
सीनियर रेजिडेंट (3 वर्षांचा करार) – 67,700 रुपये प्रति महिना
ESIC Vacancy 2024 : निवड प्रक्रिया
या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड वॉक-इन इंटरव्ह्यू च्या आधारावर त्यांच्या प्रदर्शनावर केली जाईल.
ESIC Jobs 2024 : मुलाखत कधी?
तारीख: 27 नोव्हेंबर 2024
वेळ: सकाळी 9:30 ते 10:00
स्थान: दुसरा मजला, एमएस ऑफिस, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, लुधियाना
अर्ज करण्यासाठी व इतर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील मिळवू शकता.