GAIL Recruitment 2021 : गेल इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 220 पदांवर भरती, अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
भारतातील आघाडीची नैसर्गिक गॅस कंपनी गेलमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. गेलमध्ये सरकारी नोकरी भरतीची तयारी करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.
GAIL Recruitment 2021 नवी दिल्ली: भारतातील आघाडीची नैसर्गिक गॅस कंपनी गेलमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. गेलमध्ये सरकारी नोकरी भरतीची तयारी करत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. गेल (इंडिया) लिमिटेडने विविध विभागांमधील एकूण 220 सरकारी नोकऱ्यांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल कंपनीनं जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार मॅकेनिकल, मार्केटिंग, एचआर, सिव्हिल, लॉ, राजभाषा इत्यादी विभागांमधील व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवार गेल (इंडिया) लिमिटेड gailonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवार, 7 जुलैपासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 8 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. उमेदवारांना 200 रुपये फी देखील भरावी लागेल जे अर्जादरम्यान ऑनलाईन पद्धतीने भरली जाऊ शकते. मात्र एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज फी जमा करण्याची गरज नाही. या उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये पूर्ण सवलत दिली जाते.
या पदांसाठी भरती होणार
व्यवस्थापक (मार्केटिंग वस्तू जोखीम व्यवस्थापन): 4 पदे 4 व्यवस्थापक (मार्केटिंग आंतरराष्ट्रीय एलएनजी व शिपिंग): 6 पदे वरिष्ठ अभियंता (रसायन): 7 पदे वरिष्ठ अभियंता (यांत्रिकी): 51 पदे वरिष्ठ अभियंता (विद्युत): 26 पदे वरिष्ठ अभियंता (वाद्य): 3 पदे वरिष्ठ अभियंता (सिव्हिल): 15 पदे वरिष्ठ अभियंता (गेल्टेल टीसी / टीएम): 10 पदे वरिष्ठ अभियंता (बॉयलर ऑपरेशन): 5 पदे वरिष्ठ अभियंता (पर्यावरण अभियांत्रिकी): 5 पदे वरिष्ठ अधिकारी (ई अँड पी): 3 पदे वरिष्ठ अधिकारी (एफ अँड एस): 10 पदे वरिष्ठ अधिकारी (सी आणि पी): 10 पदे वरिष्ठ अधिकारी (बीआयएस): 9 पदे वरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग): 8 पदे वरिष्ठ अधिकारी (एचआर): 18 पदे वरिष्ठ अधिकारी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन): 2 पदे 2 वरिष्ठ अधिकारी (कायदा): 4 पदे 4 वरिष्ठ अधिकारी (एफएंडए): 5 पदे अधिकारी (प्रयोगशाळा): 10 पदे अधिकारी (सुरक्षा): 5 पदे 5 अधिकारी (अधिकृत भाषा): 4 पदे
पात्रता:
गेल इंडियानं जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये वरील पदांनुसार वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
इतर बातम्या:
GAIL Recruitment 2021 bumper recruitment of 220 government jobs in GAIL Limited know details