गुगलमध्ये नोकरी कशी मिळते? कोट्यवधींचे पॅकेज कसे मिळतात? जाणून घ्या
भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये गुगलची अनेक कार्यालये आहेत. अशातच गुगलमध्ये नोकरी मिळवणे कठीण आहे, पण एकदा तुम्ही कंपनीत प्रवेश केला की तुमचे आयुष्य सेट होऊ शकते. गुगल वेबसाइटवरील नवीनतम नोकऱ्या अशा प्रकारे तपासा.

लाखो तरूणांचे स्वप्न असते की त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. यांपैकी असे काही तरूण आहेत जे गुगल कंपनीमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असतात. कारण गुगलमध्ये नोकरी मिळवणे सोपे काम नाही. गुगलही एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. जगभरात या कंपनीचा भारीभक्कम पगार त्याचबरोबर वर्क कल्चर व करिअर ग्रोथ यासाठी ही खूप नावाजलेली कंपनी म्हणुन ओळखली जाते. तसेच गुगलमध्ये तरूणांना जॉबकरिता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल यासाठी योग्य तयारी, कामांचा स्किल्स आणि प्रोसेसची माहिती असणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही भारतात असलेल्या गुगलच्या कंपनीमध्ये कोटयांवधी रूपयांची नोकरी मिळवू शकता.
गुगलमध्ये नोकरी कशी मिळवायची?
गुगलमध्ये नोकरी मिळविण्यासाठी पदवीपेक्षा स्किल्सवर अधिक लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय गुगल जॉबसाठी त्यांच्या कंपनीची कठीण परीक्षा उत्तीर्ण होणे देखील अनिवार्य आहे. तुम्हाला सुद्धा गुगलमध्ये नोकरी मिळविण्याची असेल तर या स्टेप्स फॉलो करा.
1. गुगलमध्ये नोकरी करताना स्किल्सला लक्षात घेऊन नौकरीची करा तयारी
टेक्निकल नोकरीकरीता…




गुगलमध्ये बहुतेक नोकऱ्या या टेक्निकल असतात. (सॉफ्टवेअर इंजिनिअर, डेटा सायंटिस्ट, प्रॉडक्ट मॅनेजर इ.). यासाठी तुम्ही खालील या काही मुद्यांवर लक्ष केंद्रित करून नौकरी मिळवू शकता.
प्रोग्रामिंग: Python, Java, C++ किंवा JavaScript सारख्या भाषा शिका.
डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम: हे मुलाखतीचा एक महत्त्वाचा भाग असतो.
प्रॉब्लम-सॉल्विंग : LeetCode, HackerRank सारख्या साइट्सवर सराव करा.
नॉन टेक्निकल करीता…
नॉन टेक्निकल नोकरीसाठी या लिस्टमध्ये सेल्स, मार्केटिंग आणि HR सारखे रोल्स असतात. या सेक्शनमध्ये नोकरी करण्यासाठी तुमच्यामध्ये हे स्किल्स असले पाहिजे.
स्किल : मजबूत कम्युनिकेशन स्किल्स.
डिग्री: नॉन टेक्निकल नोकरीसाठी तुम्हाला बिजनेस किंवा मॅनेजमेंटची माहिती असणे .(MBA डिग्री अधिक फायदेशीर)
कॉमन स्किल्स: इंग्रजी भाषेत fluency, लॉजिकल थिंकिंग आणि टीमवर्क असणे महत्वाचे.
गुगलमध्ये नोकरीसाठी कोणत्या पात्रता आवश्यक?
टेक्निकलमध्ये नोकऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रता: बी.टेक, एमसीए किंवा एम.टेक सारखी पदवी
नॉन-टेक्निकल नोकऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रता: बीए, बीबीए, एमबीए किंवा समतुल्य पदवी.
गुगल कंपनी पदवीपेक्षा तुमच्या स्किल्सला जास्त महत्त्व देते. जर तुमच्याकडे पदवी नसेल पण उत्तम स्किल्स असतील, तरीही तुम्हाला गुगलमध्ये नोकरीची संधी मिळू शकते.
गुगलचे फ्री सर्टिफिकेट कोर्सेस
Google Career Certificates, Coursera किंवा Udemyअसे सर्टिफिकेशन असलेले कोर्सेस करा. (जसे की Cloud Computing, Data Analytics).
गुगलमध्ये नोकरी कशी शोधावी?
अधिकृत वेबसाइट: careers.google.com वर गुगलच्या करिअर पेजला भेट द्या.
तुमच्या स्किल्सनुसार आणि आवडीनुसार नोकऱ्या शोधा.
त्यानंतर तुमच्या नोकरीचे ठिकाण निवडा. म्हणजे तुम्ही दिल्ली, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद या शहरांमध्ये राहत असाल तर ते शहर निवडा. तसेच तुम्ही नोकरी पुर्णवेळ करणार आहात की इंटर्नशिप करणार आहात हे देखील पर्याय निवडा.
लिंक्डइनवर गुगल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून रिक्त जागांची माहिती मिळवा .
जर तुम्ही गुगल कर्मचाऱ्याला ओळखत असाल तर त्यांना रेफरलसाठी विचारा. यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
गुगल कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
रिज्युम : तुम्ही तुमचा शॉर्ट एंड सिंपल रिज्युम बनवा. त्यामध्ये तुमचे स्किल्स, प्रोजेक्टस आणि अचीव्हमेंटस हाईलाइट करा.
कव्हर लेटर: तुम्हाला गुगलमध्ये का काम करायचे आहे आणि तुम्ही कंपनीच्या ध्येयाशी कसे जोडले आहात ते स्पष्ट करा.
पोर्टफोलिओ: जर तुम्ही डिझायनर किंवा डेव्हलपर असाल तर GitHub किंवा ऑनलाइन वर पोर्टफोलिओ तयार करा.
गुगल कंपनीमध्ये मुलाखतीत काय विचारले जाईल?
गुगल मुलाखत ही जगातील सर्वात कठीण मुलाखतींपैकी एक मानली जाते.
पहिली फेरी : स्क्रीनिंग : टेलिफोनिक किंवा व्हिडिओ कॉलवर तुमचे स्किल्स व अनुभव यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
दुसरी फेरी : टेक्निकल टेस्ट: यामध्ये तुम्हाला कोडिंग चॅलेंज तसेच डेटा स्ट्रक्चर, एल्गोरिदम या टेक्निकल टेस्ट द्यावे लागतात.
तिसरी आणि चौथी फेरी : ऑनसाईट इंटरव्यु :
कोडिंग प्रॉब्लम्स
तसेच तुम्ही टीम मध्ये कॉन्प्लिकेट कसे हँडल करू शकता?
सिस्टीम डिझाईन
गुगलमध्ये तुम्हाला किती पगार मिळतो?
फ्रेशर्स: दरवर्षी १५-४० लाख रुपये (इंटर्नशिप करण्याऱ्यांसाठी दरमहा ५०,०००-१ लाख रुपये देखील कमवू शकतात).
रोल आणि लोकेशननुसार ५० लाख ते २ कोटी रुपये त्यावर अधिक
गुगल ऑफिस कुठे आहे?
भारत: बेंगळुरू, हैदराबाद, गुरुग्राम, मुंबई.
परदेशात: कॅलिफोर्निया (मुख्य कार्यालय), लंडन, सिंगापूर इ.
गुगलमध्ये इंटर्नशिप कशी मिळवायची?
जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुम्ही नवीनतम अपडेट्स तपासून गुगल समर इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकता.
गुगलमध्ये दरवर्षी इंटर्नच्या रिक्त जागा असतात. यामध्ये चांगली कामगिरी करून, तुम्हाला पूर्णवेळ नोकरीची ऑफर मिळू शकते.
गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी खास टिप्स
नेटवर्किंग: गुगल इव्हेंट्स, टेक कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हा.
कोडिंग स्पर्धा: गुगलच्या कोड जॅममध्ये सहभागी व्हा. जर तुम्ही कोडिंग स्पर्धेत जिंकलात तर तुम्हाला गुगलकडून नोकरीची ऑफर मिळू शकते.
Google मध्ये निवड होण्यास 2-6 महिने लागू शकतात. म्हणून थोडा धीर धरा.
प्रक्रियेचा सारांश:
स्किल्स शिका → २. रिक्त जागा शोधा → ३. रिज्युम तयार करा → ४. अर्ज करा → ५. मुलाखत पूर्ण करा → ६. गुगल जॉब ऑफर मिळवा.