सरकारी नोकरीसाठी संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, केंद्रीय गृहमंत्रालयात काही पदांसाठी भरती
केंद्रीय मंत्रालयात सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) संधी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे (Government Jobs 2021 Ministry of home Ministry affairs vacancy for various post)
मुंबई : केंद्रीय मंत्रालयात सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) संधी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने काही पदांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये लॉ ऑफिसर ग्रेड वन आणि अकाउंट ऑफिसर या पदांसह आणखी काही पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार गृह मंत्रालयाची mha.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देवून अर्ज करु शकतो (Government Jobs 2021 Ministry of home Ministry affairs vacancy for various post).
केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेष म्हणजे संबंधित पदासांठी अर्ज दाखल करण्यासाठी मोजकाच कालावधी देण्यात आला आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 24 मे 2021 ही शेवटची तारीख असेल. त्यामुळे इच्छुक उमेदवाराने वेळ न दडवता लवकर अर्ज दाखल करावा. अर्जाची शेवटची तारीख निघून गेल्यानंतर ऑनलाईन अर्जाची ऑफिशियल वेबसाईट हटवण्यात येईल. विशेष म्हणजे अर्ज भरल्यानंतर सबमीट करण्याआधी सर्व फॉर्म पुन्हा एकदा वाचून घ्यावा. कारण एकही माहिती चुकीची गेली तर अर्ज रद्द होऊ शकतो.
कोणकोणत्या पदांसाठी, नेमकी किती जागांसाठी भरती?
लॉ ऑफिसर : 03 सीनियर अकाउंट्स ऑफिसर : 01 कंन्सल्टेंट : 06 चीफ सुपरवायजर : 05
पदांसाठी नेमकी पात्रता काय?
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नोकरीबाबत जारी करण्यात आलेल्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी लागणाऱ्या पात्रतेची देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यापैकी लॉ ऑफिसर पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉची डिग्री शिक्षण घेण्याची अट आहे. याशिवाय अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव असावा. तसेच सीनियर अकाउंट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराला केंद्र सरकारमध्ये सिनियर लेव्हलचा अकाउंट ऑफिसरची जबाबदारी दिली जाईल. याबाबतची ऑफिशियल जाहिरात बघण्यासाटी क्लिक करा.
वयोमर्यादा किती?
संबंधित भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा जाहीर करण्यात आली आहे. सर्वच पदांसाठी जास्तीत जास्त वयाची अट ही 65 वर्षांची असेल. याबाबतची सविस्तर माहिती बघण्यासाठी mha.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
पगारासंबंधित माहिती
लॉ ऑफिसर पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 35 ते 60 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. तर चीफ सुपवायझर पदासाठी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवाराला 60 हजार रुपये पगार मिळेल. तसेच सुपरवायजर पदासाठी नियुक्त झालेल्या अर्जदाराला 40 हजारपर्यंत पगार मिळेल.
हेही वाचा :
BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये निघाली 30 पदांची भरती, 21 मेपर्यंत करा अर्ज
SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर भरती, अर्ज करण्याची मुदत वाढवली