Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govt Job: पदवीधरांसाठी सरकारी नोकऱ्या, उच्च न्यायालयात पीएसाठी नोकरी, 1.14 लाखांपर्यंत पगार

ही जागा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (एमपीएचसी रिक्त) काढली आहे. या पदांवर पगारही चांगला मिळणार आहे. यासाठी पदवी व्यतिरिक्त, इतर काही पात्रता देखील मागण्यात आल्यात, ज्याचे अधिक स्पष्टीकरण केलेय.

Govt Job: पदवीधरांसाठी सरकारी नोकऱ्या, उच्च न्यायालयात पीएसाठी नोकरी, 1.14 लाखांपर्यंत पगार
mphc pa vacancy 2021
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 8:27 AM

नवी दिल्लीः Graduation level Govt Jobs: कोणत्याही शाखेतील पदवीचे तीन वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयात पर्सनल असिस्टंटची (PA) नोकरी करण्याची तुमच्यासाठी संधी आहे. ही जागा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (एमपीएचसी रिक्त) काढली आहे. या पदांवर पगारही चांगला मिळणार आहे. यासाठी पदवी व्यतिरिक्त, इतर काही पात्रता देखील मागण्यात आल्यात, ज्याचे अधिक स्पष्टीकरण केलेय.

मध्य प्रदेश उच्च न्यायालय पीए नोकरी अधिसूचना जारी

या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला मध्य प्रदेश उच्च न्यायालय पीए नोकरी अधिसूचना (एमपीएचसी पीए अधिसूचना 2021) देखील देत आहोत. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण अधिसूचना डाऊनलोड करू शकता आणि नोकरीचा संपूर्ण तपशील मिळवू शकता.

पदाचे नाव – पर्सनल असिस्टंट (PA) पदांची संख्या – 22 पगार – 36,200 ते 1,14,800 रुपये प्रति महिना (हे मूलभूत वेतन आहे. याशिवाय सर्व सरकारी भत्ते देखील दिले जातील)

पात्रता काय आहे ?

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षांचे पदवी संपादन केलेली असावी. याशिवाय मान्यताप्राप्त मंडळाकडून शॉर्टहँड टायपिंग परीक्षा (इंग्रजी, 80 wpm) (शॉर्टहँड टायपिंग) उत्तीर्ण असावी. तसेच कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स केलेला असावा. 18 ते 40 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

अर्जाची माहिती

या रिक्त पदासाठी तुम्हाला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या (MPHC) mphc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. अनारक्षित श्रेणीसाठी अर्ज शुल्क 922.16 रुपये आणि आरक्षित श्रेणीसाठी 722.16 रुपये आहे. हे डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे दिले जाऊ शकते.

निवड प्रक्रिया

निवड पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. दोन्ही परीक्षा ऑनलाईन असतील. ऑनलाईन इंग्रजी स्टेनोग्राफी डिक्टेशन टेस्ट मेन्समध्ये घेतली जाईल.

संबंधित बातम्या

BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , जीडी कॉन्स्टेबलच्या 269 पदांवर भरती

आरोग्य विभागात 3 हजार 466 जागांवर बंपर भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी

Govt Job: Government jobs for graduates, jobs for PA in High Court, salary up to Rs 1.14 lakh

ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज.
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी.
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?.
ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, रस्त्यावर पेटवली चूल अन् थापल्या भाकऱ्या
ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, रस्त्यावर पेटवली चूल अन् थापल्या भाकऱ्या.
सेन्सॉर बोर्डाची मानसिकता...'फुले' सिनेमावर आक्षेप, जयंत पाटलांचा टोला
सेन्सॉर बोर्डाची मानसिकता...'फुले' सिनेमावर आक्षेप, जयंत पाटलांचा टोला.
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवला
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवला.
'ऐपत नव्हती तर..', एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून वडेट्टीवारांचा संताप
'ऐपत नव्हती तर..', एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून वडेट्टीवारांचा संताप.
ताई - दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला
ताई - दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला.