MPSC Exam | कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, प्रशासन विभागाकडून जीआर जारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.

MPSC Exam | कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, प्रशासन विभागाकडून जीआर जारी
MPSC च्या परीक्षा सुरळीत पार पडल्या
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 10:26 PM

मुंबई : कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.

“एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी

या शासन निर्णयात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात 1 मार्च 2020 पासून जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन 25.04.2016 च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, 1 मार्च, 2020 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून 31 डिसेंबर 2022 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिध्द झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी देखील 1 मार्च, 2020 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन 25.04.2016 च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने “एक वेळची विशेष बाब” म्हणून परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल. (Great relief to the candidates who have crossed the maximum age limit)

इतर बातम्या

TET Exam : टीईटी घोटाळ्याचे रेट आधीच ठरले, ऑडिओ क्लिपने खळबळ; कशी झाली सेटिंग?

शिष्यवृत्ती संपल्यानंतरही दोन वर्षे परदेशात नोकरी करता येणार, काय आहे योजना? वाचा सविस्तर

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.