नोकरीची ही जाहिरात स्वतः हर्ष गोएंका यांनी शेअर केलीये, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल! बघाच
सध्या सोशल मीडियावर नोकरीची एक जाहिरात व्हायरल होत आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका यांनाही ही नोकरीची जाहिरात इतकी आवडली की त्यांनी लगेच सोशल मीडियावर शेअर केली.
आजच्या काळात चांगली नोकरी मिळणे हे देव भेटण्यापेक्षा कमी नाही. सुशिक्षित लोकही चांगली नोकरी शोधून थकलेत. त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. त्यामुळेच 2-4 पदांसाठी जागा रिक्त असेल तर हजारो लोक तिथे पोहोचतात. एमबीएचे लोकही शिपाई पदासाठी अर्ज करत आहेत हे आत्ताचं सत्य आहे. सध्या सोशल मीडियावर नोकरीची एक जाहिरात व्हायरल होत आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका यांनाही ही नोकरीची जाहिरात इतकी आवडली की त्यांनी लगेच सोशल मीडियावर शेअर केली. ही जाहिरात आता सोशल मीडियावर व्हायरल झाली.
नोकरीची ही जाहिरात अशी आहे की ती पाहून तुम्हालाही धक्का बसेल. गुजरातमधील नवसारी येथील भक्ताश्रम शाळेने काढलेली ही जाहिरात गणित विषयाच्या शिक्षकांसाठी आहे.
खरंतर या नोकरीच्या जाहिरातीत गणिताचा एक गुंतागुंतीचा प्रश्न देण्यात आला आहे, तो सोडवल्यावर एक मोबाईल नंबर निघेल आणि मग शाळेत गणित शिक्षक म्हणून नोकरीसाठी त्याच नंबरवर कॉल करावा लागेल.
नोकरीच्या जाहिरातींचा हा अनोखा मार्ग आहे. गणित शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल तर या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं. ही अनोखी जाहिरात पाहून हर्ष गोएंका यांना हसू आवरता आले नाही.
हर्ष गोएंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केलेली ही मजेशीर जॉब जाहिरात आतापर्यंत 10 लाख वेळा पाहिली गेली आहे, तर 14 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाइक केले आहे. 1300 हून अधिक लोकांनी ही पोस्ट रिट्विटही केली आहे.
Saw this ad ? pic.twitter.com/iVAmXjHZ1i
— Harsh Goenka (@hvgoenka) January 21, 2023
त्याचबरोबर ही मजेशीर पोस्ट पाहिल्यानंतर लोकांनी विविध मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने गमतीने लिहिलं आहे की ‘मला इथे अर्ज करायला एक वर्ष लागेल’, तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की ‘हा प्रश्न सोडवायला तीन पानं लागतात. ते करून पण ते बरोबर आहे की नाही हे 100 टक्के सांगू शकत नाही’. मात्र, काही युजर्सनी हा प्रश्न ही सोडवला असून कमेंटमध्ये मोबाइल नंबरही शेअर केला आहे.