Bank Of Baroda Recruitment 2025: पदवीधरांसाठी उत्तम संधी! बँक ऑफ बडोदामध्ये नोकरभरतीला सुरुवात
Sarkari Naukri Bank Of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. येथे काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अर्ज कसा भरावा जाणून घ्या...

Bank Of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये नोकरी करण्याचा विचार करत असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पदांसाठी अर्ज करण्याची सुर्वण संधी देत आहे. बँकेत काम करू इच्छिणारा कोणताही उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतो. या भरतीतून एकूण 4000 पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँक ऑफ बडोदामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर नक्की अर्ज करा.
बँक ऑफ बडोदाच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हालाही येथे नोकरी मिळवायची असेल, तर तुम्ही 11 मार्च किंवा त्यापूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा…
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळवण्यासाठी वयोमर्यादा




अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा: 20 वर्षे
अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा: 28 वर्षे
याशिवाय आरक्षित प्रवर्गासाठीही नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्यासाठीची पात्रता
बँक ऑफ बडोदाच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणीही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.
बँक ऑफ बडोदा मध्ये अर्ज करण्यासाठी किती फी लागणार?
जनरल (यूआर), ईडब्ल्यूएस, ओबीसीसाठी अर्ज शुल्क – रु 800
SC, ST, महिला उमेदवारांसाठी फी – 600 रुपये
PWBD (अपंग असलेले उमेदवार) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु 400
निवड झाल्यावर मिळणार स्टायपेंड
मेट्रो/शहरी शाखेसाठी स्टायपेंड: रु 15,000
ग्रामीण/निमशहरी शाखेसाठी स्टायपेंड: रु 12,000
अर्जाची लिंक आणि सूचना येथे पहा
Bank Of Baroda Recruitment 2025 साठी अप्लाय करण्यासाठी लिंक
Bank Of Baroda Recruitment 2025 नोटिफिकेशन
बँकेत नोकरी कशी मिळेल
बँक ऑफ बडोदा भर्ती 2025 अंतर्गत निवड पुढील टप्प्यात होईल
१. ऑनलाइन परीक्षा
२. कागदपत्रांची पडताळणी
३. राज्य-विशिष्ट भाषा प्राविण्य चाचणी