Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mini MBA Training : एक रुपयात मिनी एमबीए ! कसाय ? वाढीव ना ! आर्थिक पाठबळ पण देणारेत

11 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या निवडक मराठी तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी उद्यमी महाराष्ट्र आर्थिक पाठबळ देखील देणार आहे. हा अनोखा उपक्रम उद्यमी महाराष्ट्रने हाती घेतला असल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले. सायंकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत अकरा दिवस लाईव्ह मिनी एमबीएचे सत्र होणार आहे.

Mini MBA Training : एक रुपयात मिनी एमबीए ! कसाय ? वाढीव ना ! आर्थिक पाठबळ पण देणारेत
Mini MBA Training : एक रुपयात मिनी एमबीए !
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 4:24 PM

ठाणे : व्यवसायाची आवड असणाऱ्यांसाठी, व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी उद्यमी महाराष्ट्र फक्त एक रुपयात जगभरातील मराठी तरुणांना (Marathi Youth) मिनी एमबीए (Mini MBA) चे प्रशिक्षण देणार आहे. आजपासून, सोमवार 16 मेपासून या प्रशिक्षणास (Training) सुरुवात होत असून 11 दिवसांचे हे प्रशिक्षण असणार आहे. 11 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या निवडक मराठी तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी उद्यमी महाराष्ट्र आर्थिक पाठबळ देखील देणार आहे.

उद्यमी महाराष्ट्राचा अनोखा उपक्रम

उद्यमी महाराष्ट्राच्या व्यासपीठावर हजारो तरुणांना इम्पोर्ट एक्सपोर्टचे प्रशिक्षण देण्यात आले असून दोन वर्षात दहा हजार मराठी तरुणांनी उद्यमी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ओमकार हरी हरी माळी यांच्यासोबत स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. मराठी तरुणांसाठी कार्यरत असणारे उद्यमी महाराष्ट्र आता अनोखा उपक्रम घेऊन आले आहे ते म्हणजे फक्त एक रुपयात एमबीएचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिले जाणार आहे. शेवटच्या दिवशी हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटून ते व्यवसाय विषयक मोफत मार्गदर्शन देखील करणार आहेत. त्यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून 11 जणांचा ग्रुप तयार करून त्या 11 जणांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक पाठबळ देखील दिले जाणार आहे.

अकरा दिवस लाईव्ह मिनी एमबीएचे सत्र

एमबीएमध्ये जे शिकवले जाते त्याचा उपयोग व्यवसायासाठी कसा करावा याची माहिती मराठी बांधवांना मिळत नाही. त्यामुळे आर्थिक किंवा इतर तत्सम अडचणीमुळे व्यवसाय करण्याचे धाडस ते करत नाही, त्या सर्वांसाठी हा अनोखा उपक्रम उद्यमी महाराष्ट्रने हाती घेतला असल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले. सायंकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत अकरा दिवस लाईव्ह मिनी एमबीएचे सत्र होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मिनी एमबीए मध्ये खालील गोष्टींचे मिळणार प्रशिक्षण

  • व्यवसायाची निवड कशी करावी
  • शून्य रुपयांपासून पाच लाखापर्यंत कोणकोणते व्यवसाय करता येऊ शकतात
  • व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे ४. नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी करावी
  • आर्थिक व्यवस्थापन कसे करावे
  • सेल्स कसा करावा
  • कमी पैशात किंवा पैशाविना मार्केटिंग कसे करावे
  • व्यवसाय करण्यासाठी मानसिक स्थिती कशी प्रबळ करावी
  • व्यवसायाची कोणकोणते मूल्ये आहेत

प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन कसं करणार

ज्यांना मिनी एमबीएचे प्रशिक्षण हवे आहे त्यांनी 9833823333 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे एमबीए इतका मेसेज करावा

त्यानंतर त्यांना एक लिंक देण्यात येईल आणि पुढील प्रक्रिया पूर्ण होईल

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.