UPSC CAPF 2022 : सैन्यदलात भरती व्हायचंय का ? इच्छुक असाल तर परीक्षेसाठी अर्ज करा, महिलादेखील अर्ज करू शकतात
या जागांसाठी महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एनसीसी प्रमाणपत्र बंधनकारक नाही. पण तुमच्याकडे एनसीसी बी किंवा सी प्रमाणपत्र असेल तर मुलाखत किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीत त्याचा फायदा होणार.
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या असिस्टंट कमांडंट भरती प्रक्रियाचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. यूपीएससी सीएपीएफ (एसी) 2022 ची परीक्षा 07 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे. सीएपीएफ (एसी) चं नोटिफिकेशन (Notification) 2022 upsc.gov.in यूपीएससीच्या वेबसाईटवर पीडीएफ (PDF) स्वरूपात जारी करण्यात आलीये. भारतीय सैन्यदलात भरती व्हायचं असल्यास तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. या जागांसाठी महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एनसीसी प्रमाणपत्र बंधनकारक नाही. पण तुमच्याकडे एनसीसी बी किंवा सी प्रमाणपत्र असेल तर मुलाखत किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीत त्याचा फायदा होणार.
UPSC CAPF मधून कुठे भरती होणार ?
- सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)
- केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)
- भारत-तिबेट सीमा पोलीस (आईटीबीपी)
- सशस्त्र सीमा बल (एसएसबी)
महत्त्वाचे
अर्ज भरण्याची मुदत – 20 एप्रिल 2022 ते 10 मे 2022
ऑनलाईन फॉर्म – upsconline.nic.in
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर
निवड पद्धत
- अर्जाचं शॉर्ट लिस्टिंग
- लेखी परीक्षा
- उत्तीर्ण झालेल्यांना फिजिकल टेस्ट/ वैद्यकीय चाचणीसाठी बोलवणार
- निवड करून गुणवत्ता यादी जाहीर करणार
इतर बातम्या