Jobs : सरकारी बँक मॅनेजर व्हायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

अर्ज करताना उमेदवाराकडे कुठल्याही विषयातील पदवी असणं आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील २३ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

Jobs : सरकारी बँक मॅनेजर व्हायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !
आनंदाची बातमी ! Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 4:09 PM

नवी दिल्ली : सरकारी बँक मॅनेजर (Bank Manager) बनायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. ‘बँक ऑफ बडोदा’ (Bank Of Baroda)कडून १५९ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा आणि बिहार सोबतच अन्य राज्यांमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखांसाठी घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी २३ ते २५ वयोगटातील पदवीधर (Graduate) ‘बँक ऑफ बडोदा’च्या अधिकृत वेबसाईटवर bankofbaroda.in जाऊन १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

कुठल्या प्रवर्गासाठी किती जागा

बँक ऑफ बडोदामध्ये ब्रान्च मॅनेजरच्या पदासाठी एकूण १५९ पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी ६८ जागा, अनुसूचित जातीसाठी २३ जागा, अनुसूचित जमातीसाठी ११ जागा, इतर मागास वर्गासाठी ४२ जागा आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांसाठी १५ जागा आहेत.

कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक

बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरपदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे कुठल्याही विषयातील पदवी असणं आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील २३ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कमाल वयाची अट नाही.

जनरल, OBC, EWS प्रवर्गातील उमेदवारांकडून ६०० रुपये अर्जाची फी आकारण्यात येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उमेदवार त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी १०० रुपये अर्जाची फी आकारण्यात येईल.

ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटवर bankofbaroda.in जा.
  • करियर सेक्शनच्या खाली दिलेल्या About Us सेक्शनवर क्लिक करा
  • यानंतर करंट ऑपॉर्च्युनिटीच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता पुढील पेजवरील बँक मॅनेजर भरतीसाठी असणाऱ्या लिंकवर क्लिक करा.
  • अप्लाय नाऊ वर क्लिक करून सबमिट करा.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.