HSC Result 2022 Maharashtra Board Declared: बारावी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश!

Maharashtra HSC Result 2022: या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही शुभेच्छा.

HSC Result 2022 Maharashtra Board Declared: बारावी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश!
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश! Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 2:16 PM

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण (HSC 2022 Results) झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री (Cheif Minister) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे संदेश (Important Message) देखील दिले आहेत. “संधीचं सोनं करा, देशाचं भविष्य उज्ज्वल करा”,असा संदेश मुख्यमंत्र्यांनी तर “बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत”, असा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात

आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संदेश

बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

12वीनंतर विद्यार्थ्यांचा कल,आवड लक्षात घेऊन पुढील दिशा ठरवावी

यंदा 94.22 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण दोन टक्के अधिक आहे. मुली या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत, ही सुद्धा समाधानाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकिर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.

वाऱ्यापेक्षा वेगात निकाल तुमच्या दारी! फक्त TV9 मराठीवर

बारावीचा निकाल आज जाहीर झालाय सर्व विद्यार्थी आणि पालकांना अतिशय वेगवान पद्धतीनं आणि अचूक निकाल मिळवायचा असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. तुम्ही हा निकाल टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर बघू शकता. रोल नंबर, आईचं नाव आणि संबंधित माहितीच्या आधारे तुम्हाला हा निकाल आपल्या टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह बघता येणार आहे. एकदम सोप्पंय! काहीच करायचं नाही फक्त एक क्लिक करायचं. इथे क्लिक करा. बारावीचा निकाल पाहण्यासाठी या https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/07212120/desktop-maharashtra-board-12th-result-2022.jpg लिंकवर क्लिक करा.

लाईव्ह ब्लॉग

मित्रांनो बारावीच्या निकालाच्या लाईव्ह अपडेट्ससाठी, महत्त्वाच्या घडामोडी, सर्व अपडेट्स, निकालाच्या ब्रेकिंग या सगळ्या माहितीसाठी टीव्ही9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉग भेट द्या. तुम्हाला फटाफट अपडेट्स इथे मिळतील. इथे क्लिक करा – LIVE BLOG

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...