मुंबई: IIT मुंबईचे माजी विद्यार्थी असलेले IAS अधिकारी कनिष्क कटारिया यांचा UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS Officer होण्याचा प्रवास इतका प्रेरणादायी आहे की आजच्या काळात या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ शकतात. IAS कनिष्क कटारिया यांचे UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी आणि उत्तीर्ण होण्यावर इतके लक्ष होते की त्यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की 2019 मध्ये त्यांनी या परीक्षेत अखिल भारतीय रँक मिळवला आणि IAS अधिकारी बनले.
IAS कनिष्क कटारिया हे राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कोटा येथील सेंट पॉल वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून झाले. कनिष्क अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी IIT JEE 2010 मध्ये 44 वा क्रमांक मिळवला. कॉम्प्युटर सायन्समधील B.Tech आणि अप्लाइड स्टॅटिस्टिक्सचा मायनर कोर्स पूर्ण करण्यासाठी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे गेले.
कनिष्क कटारिया यांनी दक्षिण कोरियातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही वर्षांनी ते भारतात परतले आणि बेंगळुरू येथील एका अमेरिकन स्टार्टअपमध्ये रुजू झाले. कनिष्क कटारिया या नोकरीतून खूप चांगला पगार मिळवत होते, पण त्यांनी नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
कनिष्कने काही महिने दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये यूपीएससीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर सेल्फ स्टडीसाठी कोटा येथे गेले. त्यांनी २०१९ मध्ये ऑल इंडिया रँक 1 मिळवला आणि त्यांना त्यांचे मेहनतीचे फळ मिळाले. कनिष्क कटारिया यूपीएससी टॉपर बनून आयएएस अधिकारी बनला.