IAS Tina Dabi ची बहीण इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत, कलेक्टर साहिबा छा गयीं!
हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, कलेक्टर साहिबा खूप सक्रिय आहेत.
IAS Officer टीना डाबी सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. त्याच्यामुळे त्याची बहीण रिया डाबीही नेहमीच चर्चेत असतात. दोन्ही बहिणी आपल्या कामाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असतात. त्यांना त्यांच्या कामातून वेळ मिळाला तर त्या इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून स्वतःबद्दल अपडेट्स देत असतात. सध्या टीना डाबी जैसलमेरमध्ये तैनात आहे, तर रिया डाबी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात तैनात आहे. रिया डाबीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे, ज्यात ती अलवरच्या एका गावात जाऊन लोकांना काहीतरी समजावून सांगताना दिसतीये.
रिया डाबीने इंस्टाग्रामच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये रिया गावातील डझनभर लोकांसमोर उभी आहे. अनेक स्त्रिया तिथे समोर बसून आहेत, तर काही पुरुषही तिथे उभे राहून त्यांचं बोलणं ऐकत आहेत.
ती गावातील लोकांना कोणत्या तरी विषयाची जाणीव करून देत आहे, असे दिसते. हे चित्र खैरथळ, अलवर मधील असल्याची माहिती देण्यात आलीये. या काळात इतर अधिकारीही त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, कलेक्टर साहिबा खूप सक्रिय आहेत.
रिया डाबीचे इंस्टाग्रामवर 4 लाख 77 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिया डाबी अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काहीतरी पोस्ट करत असते.
गेल्या आठवड्यात 12 डिसेंबर रोजी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो अपलोड केला होता, ज्यामध्ये ती साडी नेसून एका कार्यक्रमात बसलेली दिसत आहे.
2015 मध्ये जेव्हा तिची मोठी बहीण टीना डाबी यूपीएससीच्या परीक्षेत प्रथम आली, तेव्हा ती एक मोठे व्यक्तिमत्व म्हणून उदयास आली. टीना डाबीच्या पावलावर पाऊल ठेवत रिया डाबीनेही 2021 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण केली आणि आता अलवरमध्ये असिस्टंट कलेक्टर पदावर कार्यरत आहे.