IBPS Clark 2021 : आयबीपीएस क्लार्क 2021 भरतीसाठी अधिसूचना जारी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा

यावर्षी एकूण 5 हजार 858 पदासांठी भरती होणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची निवड कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस आणि सीआरपीद्वारे केली जाणार आहे. रविवारी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.

IBPS Clark 2021 : आयबीपीएस क्लार्क 2021 भरतीसाठी अधिसूचना जारी, जाणून घ्या महत्वाच्या तारखा
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:41 AM

मुंबई : इनस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात IBPS ने लिपिक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. ही भरती प्रक्रिया अनेक सरकारी बँकांमधील 5 हजारापेक्षा अधिक पदासांसाठी होणार आहे. या पदासाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार आयबीपीएसची अधिकृत वेबसाईट IBPS.IN वर अर्ज करु शकतात. यावर्षी एकूण 5 हजार 858 पदासांठी भरती होणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची निवड कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस आणि सीआरपीद्वारे केली जाणार आहे. रविवारी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर्षी या पदासाठी प्रिलिम परीक्षादेखील घेण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रिलिम्स परीक्षेचे प्रशिक्षणही घेतलं जाणार आहे. (Notification issued for IBPS Clark 2021 recruitment)

कशी असेल भरती प्रक्रिया?

अर्ज करण्याची तारीख – 12 जुलै, 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2021

प्रिलिम परीक्षा प्रशिक्षण – 16 ऑगस्ट 2021

प्रिलिम परीक्षा – 28, 29 ऑगस्ट, 4 सप्टेंबर 2021

मुख्य परीक्षा – 31 ऑक्टोबर 2021

इच्छुक उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करताना आजपासून 1 ऑगस्टपर्यंत 850 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागणार आहेत.

प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB)मधील विविध जागांसाठी भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन बोर्ड म्हणजेच आयबीपीएसनं प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB)मधील विविध जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ऑफिसर स्केल- I(PO) प्रोबेशनरी ऑफिसर, ऑफिस असिस्टंट- मल्टिपर्पज क्लार्क आणि ऑफिसर स्केल II आणि ऑफिसर स्केल IIIच्या पदासांठी अर्ज सादर करायचे आहेत. नोटिफिकेशननुसार 10368 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. यापदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जून आहे.

संपूर्ण देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये 10368 जागांवर भरती होणार आहे. यापदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवार आयबीपीएसच्या वेबसाईटवर ipbs.in भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात. या भरतीबाबचं नोटिफिकेशन 7 जूनला जारी करण्यात आलं आहे. आयबीपीएस 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान पूर्व परिक्षेचे आयोजन करेल.

पूर्व परीक्षा कशी होणार?

आयबीपीएस पूर्व परीक्षा ऑनलाईन मोड द्वारे घेणार आहे. 1, 7 ,8,14, 21 ऑगस्टला पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. पूर्व परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बोलावलं जाईल. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर तर क्लार्क पदासाठी परीक्षा 3 ऑक्टोबरला आयोजित केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

ऑफिस असिस्टंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे स्थानिक भाषेचे ज्ञान आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ऑफिसर स्केल-I असिस्टंट मॅनेजर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील शेती, फळबागतंत्रज्ञानस, पशुवैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमातील पदवी असणं आवश्यक आहे. जनरल बँकिंग ऑफिसर पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी मात्र 50 टक्केहून अधिक गुण आवश्यक आहेत. स्पेशालिस्ट ऑफिसर माहिती तंत्रज्ञानसाठी संगणक क्षेत्रातील अभ्यासक्रमांची पदवी, पदविका असणं आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार 5 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

हा 12 अंकी खास नंबर गमावल्यास थांबू शकते पेन्शन, जाणून घ्या ईपीएफओच्या नियमाबाबत

जर आपल्या खात्यातून पैसे चोरले तर तात्काळ या क्रमांकावर करा कॉल, काही मिनिटांतच होईल कारवाई

IBPS Clark 2021 Notification issued for IBPS Clark 2021 recruitment

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.