Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IBPS Clerk Mains Result : आयबीपीएसकडून क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, 7855 पदांसाठी भरती

आयबीपीएसकडून भारतातील विविध बँकांमधील (Bank)7855 क्लार्क पदासाठी परीक्षांचं आयोजन 25 जानेवारी 2022 ला करण्यात आलं होतं. या वेबसाईटवर निकाल 1 मेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.

IBPS Clerk Mains Result : आयबीपीएसकडून क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, 7855 पदांसाठी भरती
आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षा निकालImage Credit source: IBPS Web Snap
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 5:48 PM

नवी दिल्ली : इनस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) यांच्याकडून क्लार्क मुख्य परीक्षेचा (Clerk Main Exam Result) निकाल जाहीर करण्यात आला आहे. आयबीपीएसकडून निकाल ibps.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी परीक्षेचा निकाल लिंकवर जाऊन पाहू शकतात. विद्यार्थी त्यांचा निकाल परीक्षा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख नोंदवून पाहू शकतात. आयबीपीएसकडून भारतातील विविध बँकांमधील (Bank)7855 क्लार्क पदासाठी परीक्षांचं आयोजन 25 जानेवारी 2022 ला करण्यात आलं होतं. या वेबसाईटवर निकाल 1 मेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. आयबीपीएसकडून क्लार्क पूर्व परीक्षेचं आयोजन 26 नोव्हेंबर आणि 19 डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती. तर, पूर्व परीक्षेचा निकाल 13 जानेवारी 2022 ला जाहीर करण्यात आला होता. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेत सहभागी व्हावं लागेल,

निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1 : आयबीपीएस क्लार्क परीक्षा निकाल पाहण्यासाठी ibps.in या वेबसाईटला भेट द्या स्टेप 2 :यानंतर Result of Online Main Examination for CRP-XI या लिंकवर क्लिक करा स्टेप 3 : आता तुमचा परीक्षा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख नोंदवा स्टेप 4 : तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करु शकता

या बँकेत होणार भरती

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, IBPS, UCO बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे रिक्त पदे जाहीर केली आहेत. आयबीपीएसने जारी केलेल्या सुधारित लिपिक भरती जाहिरातीत देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या बँकांमधील रिक्त पदांची श्रेणीनिहाय संख्या उमेदवार तपासू शकतात.

गुणवत्तेच्या आधारे प्रोव्हिजनल अलॉटमेंट

आयबीपीएस मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना कोणत्या बँकांमध्ये नियुक्ती होईल यांसदर्भातील प्रोव्हिजनल अलॉटमेट करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आयबीपीएसच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.

इतर बातम्या:

ST Employees strike : ‘प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अनिल परबांनी अल्टिमेटम देणंच चुकीचं’

Metro 2A आणि Metro 7 रविवारपासून सेवेत! ईस्ट-वेस्टच्या ट्रॅफिकची चिंता मिटणार

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.