IIT Jobs: आयआयटीमध्ये 4500 हून अधिक जागा रिक्त! कोणत्या आयआयटीमध्ये किती रिक्त जागा, वाचा
कोणत्या आयआयटीमध्ये किती पदे रिक्त (IIT Recruitment) आहेत, हेही सांगण्यात आले आहे. सरकारने राज्यसभेत संपूर्ण माहिती दिली. कोणत्या आयआयटीमध्ये किती पदांवर व्हेकन्सी? आयआयटीमधील प्राध्यापकांच्या (IIT Professor) नोकरीचा तपशील काय आहे?
आयआयटी फॅकल्टी (IIT Faculty) बनण्याची क्षमता तुमच्यात असेल तर या बातमीत दिलेली माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे. हे देशातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील नोकरीबद्दल आहे. देशभरातील आयआयटीमध्ये प्राध्यापकांच्या 4500 हून अधिक जागा रिक्त आहेत. केंद्र सरकारनेच याबाबत माहिती दिली आहे. कोणत्या आयआयटीमध्ये किती पदे रिक्त (IIT Recruitment) आहेत, हेही सांगण्यात आले आहे. सरकारने राज्यसभेत संपूर्ण माहिती दिली. कोणत्या आयआयटीमध्ये किती पदांवर व्हेकन्सी? आयआयटीमधील प्राध्यापकांच्या (IIT Professor) नोकरीचा तपशील काय आहे?
कोणत्या आयआयटीमध्ये किती रिक्त जागा?
- आयआयटी खरगपूर – 798
- आयआयटी कानपूर – 382
- आयआयटी मुंबई – 517
- आयआयटी मद्रास – 482
- आयआयटी बीएचयू – 271
- आयआयटी (आईएम) धनबाद – 446
- आयआयटी हैदराबाद – 113
- आयआयटी रुरकी – 419
- आयआयटी मंडी – 71
- आयआयटी गुवाहाटी – 307
- आयआयटी रोपर – 66
- आयआयटी भुवनेश्वर – ११४
- आयआयटी पटना – 97
- आयआयटी जोधपुर – 138
- आयआयटी इंदौर – 77
1 वर्ष, 18 आयआयटी, 286शिक्षक भरती
राज्यसभेत भाजपचे खासदार सीएम रमेश यांनी आयआयटीच्या प्राध्यापकांच्या रिक्त जागेवर प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, भारतातील सर्व 23 आयआयटींमध्ये प्राध्यापकांची एकूण 4,596 पदे रिक्त आहेत. सीपीएमचे खासदार ए.ए.रहीम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने सांगितले की, सप्टेंबर 2021 पासून आतापर्यंत 18 आयआयटीमध्ये 286 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. सरकारने म्हटले आहे की, आयआयटी भुवनेश्वर, भिलाई आणि आयआयटी रुरकीमधील भरती सध्या रखडली आहे. तर आयआयटी मंडी, आयआयटी पाटणा आणि तिरुपतीमध्ये प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू आहे.