मेकअप आर्टिस्टच्या प्रशिक्षणाची द्वारं खुली, मराठवाड्यातील पहिल्या लॅक्मे अकॅडमी सेंटरचे औरंगाबादेत उद्धाटन

विद्यार्थ्यांना लॅक्मे प्रमाणित आणि प्रगत प्रात्यक्षिकासह कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन मिळेल. लॅक्मे अकॅडमीची देशात 130 पेक्षा जास्त केंद्रे असून येथे 24 पेक्षा जास्त कोर्स शिकवले जाणार आहेत.

मेकअप आर्टिस्टच्या प्रशिक्षणाची द्वारं खुली, मराठवाड्यातील पहिल्या लॅक्मे अकॅडमी सेंटरचे औरंगाबादेत उद्धाटन
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 5:17 PM

औरंगाबाद: घरातील कोणतेही मंगलकार्य असो की एखाद्या चित्रपटाचे, मालिकेचे शुटींग असो, या सर्वच ठिकाणी कौशल्यपूर्ण ब्युटिशिअन, हेअर ड्रेसर, मेकअप आर्टिस्टची (Make up Artist) आवश्यकता असते. या संबंधीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आता औरंगाबादच्या इच्छुक विद्यार्थ्यांना मुंबई-पुण्यात जाण्याची गरज नाही. सौंदर्य क्षेत्रात करिअर (Carrier in beauty ) करण्यासाठी त्यांच्यासाठी शहरातच संधी उपलब्ध झाली आहे. औरंगाबाद शहरातील भाग्यनगर येथे लॅक्मे अकॅडमीचे सेंटर सुरु होत आहे.

मराठवाड्यातील पहिल्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

रविवारी 03 ऑक्टोबर रोजी अभिनेत्री उर्मिला कोठारी यांच्या हस्ते लॅक्मे अकॅडमी पॉवर्ड बाय अॅप्टेक या केंद्राचे उद्घाटन झाले. याद्वारे मराठवाड्यातील तरुणांना सौंदर्यक्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. या केंद्राच्या व्यवस्थापकीय भागीदार यामिनी सुनीथा म्हणाल्या, या केंद्रात ब्युटी आणि फॅश क्षेत्रात व्यावसायिक अभ्यासक्रम व नोकरी आधारीत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रॅक्टिकल ट्रेनिंगची विशेष संधी

येथील विक्री व्यवस्थापिका दीपिका साकेली म्हणाल्या, विद्यार्थ्यांना लॅक्मे प्रमाणित आणि प्रगत प्रात्यक्षिकासह कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन मिळेल. तसेच या क्षेत्रातील विविध मान्यवरांना थेट भेटण्याची संधी मिळेल. प्रकल्पांवर थेट भेट तसेच सौंदर्यासंबंधी विविध स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळेल. लॅक्मे अकॅडमीची देशात 130 पेक्षा जास्त केंद्रे असून येथे 24 पेक्षा जास्त कोर्स शिकवले जाणार आहेत.

औरंगाबादेत हवे आयुर्वेदाचे एम्स

आपले शहर पर्यटनाची राजधानी असून, येथे दिल्लीच्या धर्तीवर आयुर्वेदाचे एम्स स्थापन व्हावे, अशी मागणी आयुर्वेद व्यासपीठाच्या वतीने नुकतीच केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉय भागवत कराड यांच्या सत्कार कार्यक्रमात करण्यात आली. त्यावर आयुर्वेद एम्ससाठी नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले.

पैठणच्या संतपीठात पाच कोर्सेस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्या विद्यापीठाच्या पैठण येथील संतपीठात एकूण पाच अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 20 प्रवेश क्षमता आहे. म्हणजेच यंदा संतपीठात जास्तीत जास्त 100 जणांना संत परंपरेचे धडे दिले जाऊ शकतात. सहा महिन्यांच्या सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क आहे. अभ्यासक्रम सुरु झालेले असले तरी ते शिकवण्यासाठीचा अध्यापक वर्ग अद्याप येथे भरण्यात आलेला नाही.

इतर बातम्या- 

Aurangabad: महापालिका उभारणार सात चार्जिंग स्टेशन अन् ई-कारही खरेदी करणार, नव्या पदाधिकाऱ्यांसाठी पालिकेची तयारी

मोठी बातमी:  नमामि गंगे योजनेत औरंगाबादच्या खाम नदीचा समावेश, देशात नदीकाठची 30 तर महाराष्ट्रातील दोन शहरे

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....