India Post Recruitment 2021: पोस्टामध्ये दहावी उत्तीर्ण उमदेवारांना मोठी संधी, 2357 पदांची भरती

दहावीनंतर सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आली आहे. पश्चिम बंगाल सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहे.

India Post Recruitment 2021: पोस्टामध्ये दहावी उत्तीर्ण उमदेवारांना मोठी संधी, 2357 पदांची भरती
Post Office Time Deposit Account
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 1:50 PM

India Post Recruitment 2021 नवी दिल्ली: दहावीनंतर सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आली आहे. पश्चिम बंगाल सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत जीडीएसच्या एकूण 2357 पदांची भरती होईल. या पदासाठी अर्ज करू इच्छित असणारे उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो.

ग्रामीण डाक सेवक पदासाठी या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2021 पासून सुरू झाली आहे. भारतीय पोस्टामध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 ऑगस्ट 2021 पर्यंत चालणार आहे. या पदांवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाइटला भेट देऊन अधिकृत नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे. तसेच, अर्ज दाखल कोणतीही चूक उमदेवारांनी करु नये, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.

पात्रता

पश्चिम बंगाल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक पदावरील भरतीसाठी केवळ दहावीपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले तरी त्यांचं दहावीचं गुणपत्रक ग्राह्य धरलं जाईल. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दहावीमध्ये गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयाचा चा अभ्यास केलेला असणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी दहावी सोबत संगणकाचं प्रमाणपत्र मिळवलेलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त व 40 वर्षांपेक्षा कमी असावे. 20 जुलै 2021 रोजीचं वय ग्राह्य धरलं जाईल. तर, अनुसूचित जाती / जमाती, ओबीसी, पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी ओबीसी आणि पीडब्ल्यूडी एससी / एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना अनुक्रमे 5,3,10,13,15 वर्षांची सूट असेल.

निवड प्रक्रिया

पश्चिम बंगाल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक या पदासाठी उमेदवारांची निवड पात्रता परीक्षेच्या आधारावर म्हणजेच दहावीच्या गुणांसाठी केली जाईल. दहावीच्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादीनुसार अंतिम निवड केली जाईल. पश्चिम बंगालमधील जीडीएस पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 20 जुलै 2021 ते 19 ऑगस्ट 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट appost.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, प्रिंटआउट काढून ठेवू शकतात.

इतर बातम्या

Sarkari Naukri 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ, त्वरा करा

PGCIL Apprentice Recruitment 2021:पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये 1110 पदांवर भरती, आयटीआय ते पदवीधर फ्रेशर्सना मोठी संधी

India Post Recruitment 2021 GDS post for west bengal circle know details

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.