AFCAT Registration 2022 : भारतीय हवाई दलात 317 जागांवर भरती, 1 लाख 70 हजारांपर्यंत पगार, आजपासून नोंदणी सुरु

देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन एअर फोर्सनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे.

AFCAT Registration 2022 : भारतीय हवाई दलात 317 जागांवर भरती, 1 लाख 70 हजारांपर्यंत पगार, आजपासून नोंदणी सुरु
Jobs
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 8:31 AM

AFCAT Recruitment 2022 नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाकडून (Indian Air Force) सामान्य प्रवेश परीक्षा ( Air Force Common Admission Test 2022) साठी 317 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन एअर फोर्सनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. सामान्य प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

भारतीय हवाई दलाच्या नोटिफिकेशननुसार कमिशन्ड ऑफिसर या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या https://careerindianariforce.cdac.in/ किंवा https://afcat.cdac.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत आहे. भारतीय हवाई दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात. इंडियन एअरफोर्सच्या माहितीनुसार एकूण कमिशन्ड ऑफिसर पदाच्या 317 पदांवर भरती होणार आहे. यामध्ये अफकॅट एन्ट्रीद्वारे फ्लायिंग साठी 77 जागा, ग्राऊंड ड्यटीच्या 129, ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल पदासाठी 111 पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता

इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत. मात्र, बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत. ग्राऊंड ड्यटी टेक्निकल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 50 टक्के गुणांसह फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा. तर, ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. अर्ज करण्यपूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

इंडियन एअर फोर्स सामान्य प्रवेश परीक्षा फ्लाईंग ब्रांच अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 199 ते जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा. तर ग्राऊंड ड्युटीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 1997 ते 1 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा. AFCAT एन्ट्रीसाठी 250 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल.

 इतर बातम्या:

ICG Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्रे जारी, MPSC आयोगाने दिल्या महत्वाच्या सूचना

Indian Air Force AFCAT 2022 recruitment registration starts from today for 317 post check here for details

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.