भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट करा अर्ज, मेगा भरतीला सुरूवात
भारतीय हवाई दलात नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. विशेष म्हणजे आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारतीय हवाई दलात मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामुळे लगेचच अर्ज करा. भारतीय हवाई दलात नोकरी करण्यासाठी प्रवेश परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. आता उशीर न करता अर्ज करा.
मुंबई : जर भारतीय हवाई दलात नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. भारतीय हवाई दलात नोकरी करण्यासाठी प्रवेश परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. मोठी बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडतंय. यासाठी फक्त तुम्ही आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकता. भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. AFCAT 2024 परिक्षेची नोंदणी सुरू आहे. 1 डिसेंबरपासून ते 30 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
30 डिसेंबर 2023 नंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाहीये. साईटवर दिलेला फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. भारतीय हवाई दलात भरती होण्याचे तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या परीक्षेसंदर्भातील सर्व महत्वाची माहिती ही afcat.cdac.in.या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलीये. तिथे असलेला तो अर्ज तुम्हाला सर्वात अगोदर भरावा लागणार आहे.
तब्बल 317 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती विविध पदांसाठी होत आहे. यामध्ये काही नॉन-टेक्निकल तर काही जागा या टेक्निकल भरल्या जाणार आहेत. याबद्दलच्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही साईटला भेट द्या. या प्रवेश प्रक्रियेबद्दल आणि भरती प्रक्रियेबद्दल तिथे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती ही मिळून शकते.
नॉन-टेक्निकल पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे भौतिकशास्त्र आणि गणित विषयात किमान 50% गुणांसह 12 वी पास असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय किमान 60 टक्के गुणांसह बीई अथवा बीटेकमध्ये मिळायला हवे. तांत्रिक पदासाठी उमेदवाराने भौतिकशास्त्र आणि गणितात किमान 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
afcat.cdac.in साईटवर भेट द्या आणि लवकरात लवकर अर्ज करा. तिथे या भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती उपलब्ध आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात तिथेच सर्व अपडेट आपल्याला मिळतील. मात्र, भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची ही संधी अजिबातच सोडू नका. लगेचच अर्ज करा आणि थेट भारतीय हवाई दलात नोकरी करा. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 डिसेंबर 2023 आहे.