अहमदनगर येथील सैन्यभरतीसंदर्भात महत्वाची अपडेट; सप्टेंबरमधील भरती लांबणीवर, नेमकं कारण काय?
महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत असतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण सातत्यानं प्रयत्न करत असतात.
Indian Army Recruitment Rally 2021 मुंबई: महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत असतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण सातत्यानं प्रयत्न करत असतात. इंडियन आर्मीच्यावतीनं देशभर भरती प्रक्रिया राबवली जाते. या भरती प्रक्रियेचा भाग म्हणून अहमदगर येथे होणारी सैन्य भरती लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही भरती सोल्जर जनरल ड्युटी, नर्सिगं असिस्टंट आणि सोल्जर क्लार्क, सोल्जर ट्रेडसमन आणि सोल्जर टेक्निकल या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असं इंडियन आर्मीच्या पुणे येथील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
भरती लांबणीवर का टाकण्यात आली?
इंडियन आर्मीच्या वतीनं अहमदनगरमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबंर दरम्यान सैन्य भरती घेण्यात येणार होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती पुणे येथील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितलं आहे.
Maharashtra | Ahmednagar recruitment rally scheduled 7th to 23 Sep at Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri in Ahmednagar district postponed due to ongoing COVID-19 pandemic: PRO (Defence), Pune
— ANI (@ANI) August 26, 2021
अधिक अपडेटसाठी वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन
इंडियन आर्मीच्या वतीनं अहमदनगर सोबत तिरुचिरापल्ली, वाराणसी येथील सैन्य भरती देखील लांबणीवर टाकली आहे. याठिकाणच्या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांनी इंडियन आर्मीच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर भरतीच्या पुढील तारखा जाहीर केल्या जातील.
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 300 पदांसाठी भरती
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडद्वारे प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. नोटिफिकेशननुसार एकूण 300 पदांवर भरती होणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी संधी आहे. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट newindia.co.in वर भेट द्यावी लागेल.
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. अर्ज दाखल करण्यासाठी 21 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला जाईल. अर्जाचं शुल्क 21 सप्टेंबर रोजीचं जमा करावं लागेल. दोन टप्प्यात परीक्षा आयोजित केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.मात्र, परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
इतर बातम्या:
ISRO LPSC Recruitment 2021: इस्त्रो एलपीएससीमध्ये विविध पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
SBI SCO Recruitment 2021: स्टेट बँकेत नोकरी मिळण्याची संधी, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी भरती
Indian Army Ahmednagar recruitment rally postponed due to ongoing COVID-19 pandemic