ऐतिहासिक, भारतीय सैन्यात पहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांची कर्नलपदी बढती
भारतीय लष्कराच्या विविध सेवांमध्ये महिला अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणं हे महिला अधिकाऱ्यांसाठी करिअरच्या संधी वाढण्याचे लक्षण आहे. भारतीय लष्कराच्या बहुतांश शाखांमधून महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या निर्णय यापूर्वी घेण्यात आला.
नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या सिलेक्शन बोर्डानं 26 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल (टाइम स्केल) पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. कॉर्प्स ऑफ सिग्नल, इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) आणि कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्समध्ये सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदी बढती देण्यात आली आहे. भारतीय लष्करातील वरील सेवामध्ये महिलांची कर्नलपदी बढती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कर्नल पदावर पदोन्नती केवळ आर्मी मेडिकल कॉर्प्स (एसएमसी), जज अॅडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्स (एईसी) च्या महिला अधिकाऱ्यांना लागू होती.
भारतीय लष्कराच्या विविध सेवांमध्ये महिला अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणं हे महिला अधिकाऱ्यांसाठी करिअरच्या संधी वाढण्याचे लक्षण आहे. भारतीय लष्कराच्या बहुतांश शाखांमधून महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या निर्णय यापूर्वी घेण्यात आला. हे भारतीय लष्करातील स्त्री पुरुष भेद कमी करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
कुणाची निवड झाली?
कर्नल टाइम स्केल रँकसाठी पाच महिला अधिकाऱ्यांची निवड झालीय. सिग्नल कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि इंजिनियर्स कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल रीनू खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांची निवड झाली आहे.
सध्याची भारतरीय लष्कराची पिरॅमिड रचना आणि कडक निवड निकषांमुळे अनेक अधिकारी कर्नल पदापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत सेवेत असलेले कर्नल निवृत्त होत नाही किंवा ब्रिगेडियरला बढती मिळत नाही. 26 वर्षांच्या सेवेनंतर ते कर्नल बनू शकतात म्हणून त्यांना कर्नल (टाईम स्केल ) म्हणून त्यांचा दर्जा लिहितो.
NDA परीक्षेत महिलांना संधी द्या, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
सुप्रीम कोर्टानं नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश घेण्यासाठी परीक्षेला बसण्यास परवानगी दिली आहे. एनडीएची परीक्षा 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं महिलांना संधी देण्याला विरोध करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे. याशिवाय संबंधित घटकांनी त्यांची भूमिका बदलण्याबाबत सुनावलं आहे. तर, न्यायालयानं आदेश दिल्याशिवाय आपण काही करणार नाही का?, अशी विचारणा देखील केली आहे.
इतर बातम्या:
NDA परीक्षेत महिलांना संधी द्या, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशानं मुली NDA ची परीक्षा देणार, प्रवेशासंदर्भात पेच कायम
Indian Army grants time scale Colonel Rank to Women Officers in various services