भारतीय लष्करात भरती, दहावी पास विद्यार्थ्यांना देशसेवेची संधी, कोणत्याही शुल्काशिवाय करा अर्ज

भारतीय लष्कराच्या हेडक्वॉर्टर साऊथ कमांडने ग्रुप सी पदाकरीता भरती प्रक्रिया सुरु केली असून दहावी उत्तीर्ण तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे.

भारतीय लष्करात भरती, दहावी पास विद्यार्थ्यांना देशसेवेची संधी, कोणत्याही शुल्काशिवाय करा अर्ज
Group-C-RecruitmentImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 6:57 PM

नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : इंडीयन आर्मीच्या हेडक्वार्टर साऊथ कमांडने साल 2023 साठी ग्रुप सी पदासाठी नोकर भरती सुरु केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 24 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी 18 सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. अर्जदारांना https://www.hqscrecruitment.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

इंडीयन आर्मी हेडक्वार्टर साऊथ कमान ग्रुप सी भरती 2023 साठी कोणताही अर्ज शुल्क असणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणतेही शुल्क न भरता येथे मोफत अर्ज करु शकता. उमेदवाराचे वय 18 वर्ष ते कमाल 25 दरम्यान असायला हवे. या भरतीसाठी उमेदवाराच्या वयाची मोजणी 8 ऑक्टोबर 2023 या तारखेच्या आधारे करावी असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. या ग्रुप सी पदासाठी 18 सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रीया सुरु होणार असून शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 अशी आहे. परीक्षेसाठीच्या तारखांना नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वेतन

इंडीयन आर्मी हेडक्वार्टर साऊथ कमांड  ग्रुप सी पदासाठी 10 वी पास विद्यार्थी अर्ज करु शकणार आहेत. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरील शैक्षणिक अर्हतेची माहीती स्वत: वाचून आपला अर्ज करावा. इंडीयन आर्मी साऊथ कमान ग्रुप सी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18000 – 63200 प्रति महीने वेतन दिले जाऊ शकते. आरबीआयच्या रिक्त जागा आणि 2023 च्या भरतीकरीता अर्ज करण्यासाठी https://www.hqscrecruitment.in/ या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी. इंडीयन आर्मी या पदासाठी तारखानंतर जाहीर करणार आहे.

त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.