Indian navy recruitment 2021 : परीक्षेविना ऑफिसर बनण्याची संधी, 2 जुलैपासून अर्ज करता येणार, शैक्षणिक पात्रता काय, पाहा…

| Updated on: Jun 29, 2021 | 9:49 AM

केरळच्या इंडियन नेव्ही अॅकॅडमी एजिमाला येथे विशेष नेव्हल ओरिएंटेशन कोर्स अंतर्गत आयटीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी लवकरच नेव्ही अर्ज मागवत आहे. (Indian navy recruitment 2021 Apply online Application)

Indian navy recruitment 2021 : परीक्षेविना ऑफिसर बनण्याची संधी, 2 जुलैपासून अर्ज करता येणार, शैक्षणिक पात्रता काय, पाहा...
Indian navy recruitment
Follow us on

मुंबई : इंडियन नेव्ही अॅकॅडमी केरळच्या एजिमाला येथे विशेष नेव्हल ओरिएंटेशन कोर्स अंतर्गत आयटीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी लवकरच नेव्ही अर्ज मागवत आहे. पात्र उमेदवार इंडियन नेव्ही रिक्रुटमेंट 2021 साठी 2 जुलै ते 16 जुलै 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट अर्थात joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. (Indian navy recruitment 2021 Apply online Application)

एसएसबीसाठी 21 जुलै 2021 रोजी बंगळुरु, भोपाळ, कोलकाता, विशाखापट्टणम येथे मुलाखत घेण्यात येणार आहे.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख: 2 जुलै 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीखः 16 जुलै 2021

पद विवरण एक्झिकेटिव्ह ब्रँच – 45 पदे

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये बीई/बीटेक, एमएससी संगणक/आयटी, एमसीए किंवा एमटेक संगणक/आयटी पदवी संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी/आयटीमध्ये किमान 60% गुणांसह असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

उमेदवार इंडियन नेव्ही एसएससी आयटी रिक्रूटमेंट 2021 साठी अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर 02 जुलै ते 16 जुलै 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

(Indian navy recruitment 2021 Apply online Application)

हे ही वाचा :

OPSC Recruitment 2021: 351 पदांसाठी भरती, 44900 पगार, आजच अर्ज करा..

Police Recruitment 2021: पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती, शेकडो जागा, वाचा अर्ज कसा करायचा?

NCL Recruitment 2021 : 8 वी, 10 वी पासवाल्यांसाठी नोकरीची संधी, 1500 पदांसाठी भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येतेय!

IBPS RRB Recruitment 2021 : बँकेतील नोकरी, तगडा पगार, अर्ज करण्यासाठी उरले काही तास!