Indian Navy: भारतीय नौदलाची बंपर व्हेकन्सी! ऑनलाईन अर्ज, 6 सप्टेंबर पर्यंतची मुदत

ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. अशा परिस्थितीत या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात – joinindiannavy.gov.in. ही भरती भारतीय नौदलात भरती होण्याच्या माध्यमातून केली जात आहे.

Indian Navy: भारतीय नौदलाची बंपर व्हेकन्सी! ऑनलाईन अर्ज, 6 सप्टेंबर पर्यंतची मुदत
Indian Navy Vacancy
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 2:31 PM

ट्रेड्समन मेट या पदांसाठी भारतीय नौदलाने बंपर व्हेकन्सी जारी केली आहे. या रिक्त पदांच्या माध्यमातून एकूण ११२ पदे भरण्यात येणार आहेत. नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. अशा परिस्थितीत या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारतीय नौदलाच्या (Indian Navy) अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात – joinindiannavy.gov.in. ही भरती भारतीय नौदलात भरती होण्याच्या माध्यमातून केली जात आहे. ट्रेड्समन मेट पदांसाठी जारी करण्यात आलेल्या या रिक्त जागेसाठी आजपासून म्हणजेच 06 ऑगस्ट 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 06 सप्टेंबर 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठीच्या परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) जाऊन रिक्त जागांची (Vacant Post) संपूर्ण माहिती तपासून पाहू शकतात.

ऑनलाइन अर्ज करा

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ- joinindiannavy.gov.in भेट द्यावी.
  • वेबसाइटच्या होम पेजवरील नवीनतम रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर 112 पोस्टसाठी इंडियन नेव्ही एचक्यू ए अँड एन ट्रेड्समन मेट ऑनलाइन फॉर्म 2022 च्या पर्यायावर जा.
  • आता अर्ज ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.
  • पुढील पानावर मागितलेला तपशील प्रविष्ट करा आणि नोंदणी करा.
  • नोंदणीनंतर तुम्ही अर्ज भरू शकता.

थेट लिंकवरून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

ट्रेड्समन मेट पात्रता : पात्रता आणि वय

या रिक्त जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचे दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि २५ वर्षांपेक्षा कमी असावे. 06 सप्टेंबर 2022 च्या आधारे वयाची गणना केली जाईल.

निवड प्रक्रिया

  • या रिक्त जागेवर गुणवत्तेच्या आधारे शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन बेस्ड लेखी परीक्षेत उपस्थित राहावे लागणार आहे.
  • परीक्षेची प्रश्नपत्रिका 100 गुणांची असेल आणि इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल.
  • उमेदवारांना परीक्षेची नेमकी तारीख, वेळ आणि ठिकाण याची माहिती मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर दिली जाणार आहे. मुख्यालय अंदमान निकोबार कमांडसाठी ही भरती केली जाणार आहे.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.