Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना पश्चिम रेल्वेत मोठी संधी
भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी मोठी संधी आहे. Indian Railways Recruitment apprentice

RRB Recruitment 2021 मुंबई: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केलीय. पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अपरेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 जून आहे. (Indian Railways Recruitment for 3591 apprentice application date and detail click here)
पदाचे नाव अप्रेंटिस
पदांची एकूण संख्या
पश्चिम रेल्वे (Western Railway) विभागात 3591 पदावंर अप्रेटिससाठी संधी देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे.
पात्रता
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण आवश्यक असून त्याशिवाय संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमीत कमी वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे.
उमेदवारांची निवड कशा प्रकारे होईल?
उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
अर्जाचे शुल्क
खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.
अर्ज कुठे करायचा?
इच्छुक उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या पश्चिम विभागाच्या वेबसाईट www.rrc-wr.com वर जाऊन अर्ज सादर करावेत.
अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सुकन्या योजनेसह छोट्या बचत ठेवीदारांना मोठा झटका बसणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यताhttps://t.co/iFj4uumU5N#Sukaya | #Money | #Busness | #Government
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2021
संबंधित बातम्या
Railway Jobs : 10वी पाससाठी तरुणांसाठी मोठी संधी, कुठल्याही परीक्षेविना मिळवा नोकरी
India Post Recruitment 2021 : 10वी पास असाल तर तुम्हाला सरकारी नोकरीची संधी!
Indian Railways Recruitment for 3591 apprentice application date and detail click here