Intelligence Bureau : काय करताय ? आर्मी नाही तर IB मध्ये तरी प्रयत्न करा ! 150 जागा आहेत, देशसेवेची सुवर्णसंधी
इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे GATE ज्यांनी दिली असेल तेच उमेदवार अर्ज करू शकतात. 2022/2021/2020 या तीन वर्षाचे GATE चे मार्क्स गृहीत धरले जातील. सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर आहे त्यावर लक्ष असुद्या.
नवी दिल्ली : मान, सम्मान, प्रतिष्ठा असणारी नोकरी (Job) म्हणजे अर्थातच इंटेलिजन्स ब्युरोची (Intelligence Bureau) नोकरी ! इंटेलिजन्स ब्युरो कडून सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 टेक्निकल या पदासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 150 जागा आहेत. शिक्षण, वयाची अट, शेवटची तारीख खाली दिली आहे. इंटेलिजन्स ब्युरोची प्रक्रिया लवकर आणि वेळेत होते त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे GATE ज्यांनी दिली असेल तेच उमेदवार अर्ज करू शकतात. 2022/2021/2020 या तीन वर्षाचे GATE चे मार्क्स गृहीत धरले जातील. सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर आहे त्यावर लक्ष असुद्या. मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.
पदाचे नाव – IB ACIO Grade 2 इंटेलिजन्स ब्युरो सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 टेक्निकल
वयाची अट – 18 ते 27 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करायची मुदत – 16 एप्रिल ते 7 मे 2022
एकूण जागा – 150
कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CS) – 56
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (EnTC ) – 94
निवड करण्याची पद्धत
1) GATE चे मार्क्स आणि मुलाखत
2) GATE च्या मार्क्सचं वेटेज 1000 असणारे आणि इंटरव्यू 175 मार्क्सचा असेल.
शिक्षण
कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग (CS)
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (EnTC )
उमेदवार GATE 2022/2021/2020 परीक्षा उत्तीर्ण हवा.
वेतन
44,900 – 1,42,400/-
अर्ज शुल्क
जनरल/ EWS/ OBC – 100/- रुपये अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / महिला/ माजी सैनिक – शुल्क नाही
महत्त्वाचे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मे 2022
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – mha.gov.in
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
इतर बातम्या :