IOCL Recruitment 2022 नवी दिल्ली : इंडियन ऑईलमध्ये अप्रेंटिसच्या संधींच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने पश्चिम विभागातील रिफायनरीजमध्ये 570 पदांच्या अप्रेंटिसच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. टेक्निकल ट्रेड, नॉन टेक्निकल ट्रेड आणि टेक्निशियन पदासाठी अप्रेंटिस करण्याची संधी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दादरा नगर हवेली या ठिकाणी निवड झालेल्या उमदेवारांना काम करावं लागेल. IOCL प्रशिक्षणार्थीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी अधिकृत भरती पोर्टल iocl.com ला भेट देणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 15 फेब्रवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
स्टेप 1 : उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी अधिकृत भरती पोर्टल iocl.com ला भेट देणे आवश्यक आहे.
स्टेप 2: होम पेजवरील करिअरच्या लिंकला भेट द्या.
स्टेप 3 : मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा.
स्टेप 4 : ऑनलाईन अर्ज सादर करुन त्याची प्रिंट आऊट घ्या. .
IOCL अप्रेंटिसशिपद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून पूर्ण वेळ डिप्लोमासह 10+2 पूर्ण केले पाहिजे. तर ट्रेड अप्रेंटिससाठी, मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्णवेळ पदवी केलेली असावी. सर्व रिक्त पदांसाठी वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमदेवारांची निवड लेखी परीक्षेनंतर केली जाणार आहे. लेखी परीक्षा ही बहूपर्यायी स्वरुपाची असेल. 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अखेरची मुदत आहे.
इतर बातम्या:
Mhada Hall Ticket : म्हाडाकडून ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा एक व दोनचे प्रवेश प्रमाणपत्र जारी
IOCL Recruitment 2022 Indian Oil invited 570 apprenticeship posts check details here