IT कंपनीच्या नावाखाली फसवणूक! ‘या’ जॉब ऑफरला बळी पडू नका

आपलं नसलं तरी आपल्या मित्रपरिवारात असे खूप आहेत. पण विचार करा, एखाद्याला समजा परदेशातून नोकरीची ऑफर आली आणि तो जर फ्रॉड निघाला तर? भयानक आहे हे!

IT कंपनीच्या नावाखाली फसवणूक! 'या' जॉब ऑफरला बळी पडू नका
Job racketImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 2:22 PM

आपल्यापैकी अनेकांना परदेशात नोकरी करायची हौस असते. अनेकांचं ते स्वप्न असतं. आपलं नसलं तरी आपल्या मित्रपरिवारात असे खूप आहेत. पण विचार करा, एखाद्याला समजा परदेशातून नोकरीची ऑफर आली आणि तो जर फ्रॉड निघाला तर? भयानक आहे हे! असा प्रकार सध्या सर्रास सुरु आहे. यासंबंधात भारत सरकारकडून एक सूचना जारी करण्यात आलीये. त्याचं झालं असं की एका बनावट आयटी कंपनीने तब्बल 100 हून अधिक लोकांची फसवणूक केलीये. या लोकांना “परदेशात नोकरी देतो” असं म्हणत म्यानमारला नेण्यात आलंय. यातून आतापर्यंत 32 भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आलीये.

आयटी नोकरी मिळण्याच्या बहाण्याने म्यानमारच्या दुर्गम भागात या इच्छुक उमेदवारांना नेण्यात आले. याच भागात अडकलेल्या 60 जणांच्या मदतीसाठी भारत सध्या थायलंड आणि म्यानमारसोबत काम करत आहे. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 32 भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे.

‘डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भारतीय तरुणांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक नोकरीची ऑफर दिली जात आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलंय.

हे पूर्णपणे बनावट जॉब रॅकेट असून, त्याचा उद्देश तरुणांना जाळ्यात ओढणे हा आहे, अशी माहिती या मिशनला मिळाली आहे. कॉल-सेंटर घोटाळा आणि क्रिप्टो-करन्सी घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या संशयित आयटी कंपन्यांकडून हे रॅकेट चालवले जात आहेत.

“बँकॉक आणि म्यानमारमधील आमच्या मिशनच्या लक्षात आले आहे की बनावट जॉब रॅकेट थायलंडमधील ‘डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह’च्या पदांवर नियुक्तीसाठी भारतीय तरुणांना आकर्षक नोकरी देत आहेत. बनावट कॉल सेंटर्स आणि क्रिप्टो-करन्सी फसवणुकीत गुंतलेल्या संशयित आयटी कंपन्यांकडून या नोकऱ्यांची ऑफर दिली जातीये.” असे निवेदनात म्हटले आहे.

यात बहुतेक लोकांना भारताबाहेर नेण्यात आलंय. बहुतेक लोकांना म्यानमारला नेण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे दिल्या जाणाऱ्या अशा बोगस जॉब ऑफरला बळी न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.