या ठिकाणी घ्या शिक्षण, आयुष्यभर खिसा पैश्यांनी भरलेला राहील, 4.5 लाखाचं पॅकेज मिळेल

जामिया मिलिया इस्लामियाच्या प्लेसमेंट सेलने 2024 च्या प्लेसमेंट सीझनचा पहिला भाग यशस्वीपणे पूर्ण केला आहे. विद्यार्थ्यांना 24.5 लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक पॅकेज मिळाले आहेत. सिस्को, होमसेंटर, ऑप्टम, आणि अशा अनेक प्रतिष्ठित कंपन्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली आहे. दुसरा फेज जानेवारी 2025 मध्ये सुरू होईल, ज्यामध्ये आणखी चांगल्या संधींची अपेक्षा आहे. हे प्लेसमेंट जामिया मिलिया इस्लामियाच्या उच्च दर्जाच्या शिक्षणाचे आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे प्रमाण आहे.

या ठिकाणी घ्या शिक्षण, आयुष्यभर खिसा पैश्यांनी भरलेला राहील, 4.5 लाखाचं पॅकेज मिळेल
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 1:20 PM

इयत्ता 12 वी पास झाल्यानंतर पुढचं शिक्षण कुठं घ्यायचं याची चिंता मुलांना नेहमीच सतावत असते. शिक्षण घेतल्यानंतर लगेच प्लेसमेंट मिळेल आणि नोकरी मिळेल यासाठी चांगलं कॉलेज आणि शिक्षण संस्था शोधत असतात. अशाच काही कॉलेजचा तुम्ही शोध घेत असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही कॉलेजची माहिती देणार आहोत, त्यातून शिक्षण घेतल्यावर तुम्हाला लगेच नोकरी मिळेल. 24.5 लाखांचं पॅकेजही मिळेल. जामिया मिलिया इस्लामिया या महाविद्यालयाची माहिती तुम्हाला देणार आहोत.

जामिया मिलिया इस्लामियाने कँपस प्लेसमेंट सीजनच्या पहिल्या फेजला यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. या फेजमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षक सॅलरी पॅकेज आणि विविध उद्योगात करिअरमध्ये संधी मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सर्वाधिक पॅकेज 24.5 लाख रुपये वर्षाला दिलं गेलं आहे. होमसेंटर लँडमार्कने हा जॉब दिला आहे. तर सिस्कोने वार्षिक 24 लाख पॅकेजची ऑफर दिली आहे.

जामिया मिलिया इस्लामियाच्या प्लेसमेंटच्या इतर ऑफर

  • ऑप्टम: 18 लाख रुपये प्रति वर्ष
  • मॅकिन्ले राइस: 16 लाख रुपये प्रति वर्ष
  • जेनॉन अॅनालिटिक्स: 14 लाख रुपये प्रति वर्ष
  • एक्सेंचर: 11.89 लाख रुपये प्रति वर्ष
  • आयसीआयसीआय बँक: 11.5 लाख रुपये प्रति वर्ष
  • टीसीएस: 9 लाख रुपये प्रति वर्ष
  • एलएंडटी: 6 लाख रुपये प्रति वर्ष
  • एटकिंस रियलिस: 6.22 लाख रुपये प्रति वर्ष

प्रमुख कंपन्यांचा प्लेसमेंटमध्ये सहभाग

या प्लेसमेंट सीजनमध्ये 40हून अधिक प्रतिष्ठीत कंपन्यांनी भाग घेतला. यात सिस्सोक, होमसेंटर दुबई, ऑप्टम, मॅकिन्ले राइस, एक्सेंचर, श्राइडर इलेक्ट्रिक, टीसीएस, आयबीएम इंडिया, एचएसबीसी टेक्नॉलॉजी, एल अँड टी, सीमेन्स, रॉकवेल ऑटोमेशन, इन्फोएज, एस्टानग्रीन्स आणि आर्टिकस रिअलिस आदी कंपन्यांचा सहभाग होता.

त्याशिवाय येणाऱ्या काळात आयबीएम इंडिया, यामाहा, सी-डॉट, एक्सेंचर स्ट्रॅटेजी अँड कन्स्लटिंग, हेक्साव्ह्यू टेक्नॉलॉजीज, जेडएस असोसिएट्स, स्टील स्ट्रिप्स व्हील लिमिटेड, एसअँडपी ग्लोबल आणि जॅकब्स सॉल्यूशन इंडिया आदी कंपन्या या प्लेसमेंट प्रक्रियेत सामील होण्याची शक्यता आहे.

जोरदार प्रतिसाद

प्लेसमेंट सेलचे डायरेक्टर प्रोफेसर राहेला फारुकी यांनी पहिल्या फेजचा रिझल्ट चांगला आल्याचं सांगितलं. आता जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या फेजची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. जानेवारी 2025मध्ये दुसरा फेज सुरू होईल. या फेजमध्ये विद्यार्थ्यांना आणखी चांगली संधी मिळण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. जामिया मिलिया इस्लामियाचं हे प्लेसमेंट या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षण मिळत असल्याचं आणि या ठिकाणचे विद्यार्थी हुशार असल्याचं द्योतक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.