Maharashtra Postal Department : महाराष्ट्र डाक विभागात नोकरी ! उपलब्ध जागा, शैक्षणिक पात्रता एका क्लिकवर

| Updated on: May 20, 2022 | 3:21 PM

उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावं. कॅटेगरीनुसार वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे. पात्र उमेदवाराची निवड मेरिट लिस्टच्या (Merit List) आधारे करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

Maharashtra Postal Department : महाराष्ट्र डाक विभागात नोकरी ! उपलब्ध जागा, शैक्षणिक पात्रता एका क्लिकवर
महाराष्ट्र डाक विभागात नोकरी !
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

तब्बल 3026 जागांसाठी महाराष्ट्र डाक विभागात (Maharashtra Postal Department) भरती जाहीर करण्यात आली आहे. 5 जून 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज (Online Application) करू शकतात. उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावं. कॅटेगरीनुसार वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे. पात्र उमेदवाराची निवड मेरिट लिस्टच्या (Merit List) आधारे करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. ग्रामीण डाक सेवक असं भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेल्या पदाचं नाव आहे. अर्ज 2 मे 2022 रोजी सुरु झालेले आहेत त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा. एकूण 3026 जागांमध्ये जनरल साठी 1324 जागा,ओबीसी 754 जागा, इडब्ल्यूएस 302 जागा, एससी 287 जागा एसटी 270 जागा, पीडब्ल्यूडी ए 12 जागा, पीडब्ल्यूडी बी 20 जागा, पीडब्ल्यूडी सी – 47 जागा आणि पीडब्ल्यूडी डी इ साठी 10 जागा आहेत.

कॅटेगरीनुसार उपलब्ध जागा

एकूण 3026 जागा

  1. जनरल (General) – 1324 जागा
  2. ओबीसी (OBC) – 754 जागा
  3. इडब्ल्यूएस (EWS)- 302 जागा
  4. एससी (SC) – 287 जागा
  5. एसटी (ST)  – 270 जागा
  6. पीडब्ल्यूडी ए (PwD A) – 12 जागा
  7. पीडब्ल्यूडी बी (PwD B) – 20 जागा
  8. पीडब्ल्यूडी सी (PwD C)  – 47 जागा
  9. पीडब्ल्यूडी डी इ (PwD DE) – 10 जागा

वयाची अट

  • किमान वय – 18 वर्षे
  • कमाल वय – 40 वर्षे

कॅटेगरीनुसार वयाच्या अटीत सूट

  • SC/ST – 5 वर्षे
  • OBC – 3 वर्षे
  • EWS – No Relaxation
  • PwD – 10 वर्षे
  • PwD + OBC – 13 वर्षे
  • PwD + SC/ST – 15 वर्षे

अर्ज शुल्क

  • Women, Transgender Woman Candidate, SC/ST – No Fee
  • EWS Male/ OBC / UR/ Trans-man – 100/-

इतर माहिती

  • निवड पद्धत – मेरिट लिस्ट
  • वयाची अट – 18 ते 40 वर्षे
  • नोकरीचं ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करायची शेवटची तारीख – 05 जून 2022
  • वेतन – 12,000/- रुपये
  • शेवटची तारीख – 5 जून 2022

महत्त्वाचे

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया महाराष्ट्र डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.