Job Alert : नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीत नोकरीची संधी, 114 जागांसाठी होणार थेट मुलाखत

या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 आणि 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

Job Alert : नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीत नोकरीची संधी, 114 जागांसाठी होणार थेट मुलाखत
job
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 9:56 PM

नाशिक : नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये (Gokhale Education Society Nashik Recruitment 2021) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठीची अधिसूचना (Nashik Jobs) जारी करण्यात आली असून लवकरच 114 जागांसाठी पदभरती होणार आहे. ही भरती सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 आणि 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. (Job opportunities in Gokhale Education Society in Nashik, direct interview for 114 posts)

कोणत्या पदांसाठी भरती

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 114

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्जाची फी

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत 200 रुपयांचा IPO जोडणं आवश्यक आहे.

कोणती कागदपत्रं आवश्यक

शैक्षणिक प्रमाणपत्र पदभरतीचा अर्ज पासपोर्ट साईझ फोटो वरील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स असणं आवश्यक.

मुलाखतीचा पत्ता

सर डॉ. एम. एस. गोसावी इन्स्टिट्युट ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. T. A. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक पिन. 422 005.

मुलाखतीची तारीख – 13 आणि 14 ऑक्टोबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://gesociety.in/ या लिंकवर क्लिक करा

मुंबई महापालिकेत विविध पदांवर भरती

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेले उमदेवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करु शकतात. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचणं आवश्यक आहे. मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत कंत्राटी तत्वावर समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

समाज विकास अधिकारी पदासाठी उमेदवार समाजकार्य अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य अभ्यासक्रमाची पदवी घेतेलेली असणं आवश्यक आहे. सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी देखील समाज कार्य पदवी अभ्यासक्रमाची पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 20 वर्षांहून अधिक काळ अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टेट बँकेत 2056 जागांवर भरती

स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. स्टेट बँकेत या भरतीद्वारे 2056 जागांवर भरती केली जाणार आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या sbi.co.in या वेबसाईटवरील करिअर टॅबमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावा.

स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदावारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेले नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 4 ऑक्टोबर 2021 रोजी नोटिफिकेशन जारी केलं आहे. (Job opportunities in Gokhale Education Society in Nashik, direct interview for 114 posts)

इतर बातम्या

नागपूर झेपी आणि पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान संपन्न, कोण बाजी मारणार?

आदिवासी पारधी महासंघ काँग्रेस पक्षात विलीन, नाना पटोले म्हणतात आम्ही विकासासाठी कटिबद्ध !

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.