मुंबई : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी (Engineering Students) भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेडने (IPRCL) 10 जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीये. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख (Last Date) 3 मे 2022 आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे त्यासाठीचा पत्ता खाली बातमीमध्ये दिलेला आहे. शैक्षणिक अट फक्त एकच आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीचा पदवीधर असावा/ असावी. एकूण 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेली PDF नक्की वाचा ज्यात यासंबंधीची अधिक माहिती आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. रिक्त पदं ही पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी साठीची आहेत त्यामुळे एक किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असणाऱ्यांनी अर्ज करू नका. बातमी नीट वाचून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Additional General Manager (HR), Indian Port Rail & Ropeway Corporation Limited, 4th Floor, Nirman Bhvana, Mumbai Port Trust Building, M.P Road, Mazgaon Mumbai – 400010
पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी
03 मे 2022 रोजी 23 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
सिव्हिल / Civil – 07
इलेक्ट्रिकल/ Electrical – 03
शिक्षण – अभियांत्रिकीमध्ये पदवी
प्रशिक्षणाचा कालावधी – 1 वर्ष
नोकरीचं ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करायची मुदत – 3 मे 2022
वेतन – 10,000/- रुपये
अर्ज शुल्क – शुल्क नाही
मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.
Official Website – www.iprcl.in
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.